Kusum Mahaurja : महाऊर्जा कुसुम सोलर पंप पेमेंट बाबत महत्वाचे अपडेट | पेमेंट फेल झाले असेल आणि ती रक्कम परत मिळाली नसेल तर हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Mahaurja : राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते त्या अर्जाची छाननी करून जे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत त्याना सेल्फ सर्वे करण्यासाठी त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल क्रमांक वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. आणि ज्या शेतकर्‍यांचे अर्ज हे काही कारणास्तव त्रुटि मध्ये आहेत त्यांना कागदपत्रे परत अपलोड करण्याचा ऑप्शन त्यांच्या लॉगिन मध्ये देण्यात आला आहे.

Kusum-Mahaurja-Update

 

सेल्फ सर्वे केल्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांना पैसे भरण्यासाठी ऑप्शन देण्यात आला होता (Kusum Mahaurja) आणि याद्वारे बर्‍याच शेतकर्‍यांनी पेमेंट केले परंतु काही शेतकर्‍यांचे हे पेमेंट फेल झाले होते. त्यानंतर महाऊर्जा ने फेल झालेले पेमेंट हे संबंधित शेतकर्‍यांच्या खात्या मध्ये परत केले आहे. परंतु, काही शेतकर्‍यांचे पैसे हे परत न येता त्यांना पैसे भरा म्हणून हा ऑप्शन दाखवत आहे तर अशा शेतकर्‍यांनी आपल्या जिल्ह्यातील महाऊर्जा ऑफिस ला भेट द्यावी.

 

 

पेमेंट फेल झाले आणि पैसे देखील परत आले नाही ? Kusum Mahaurja

 

ज्या शेतकर्‍यांचे पेमेंट फेल झाले होते आता त्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये परत पेमेंट करा असे ऑप्शन दाखवत असेल आणि अगोदरचे पैसे देखील परत मिळाले नसतील तर अशा शेतकरी बांधवांनी अगोदर आपले अगोदरचे पैसे हे परत मिळवून घ्यावेत आणि नंतरच पुढील पेमेंट करावे. यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील महाऊर्जा कार्यालयात एक लेखी अर्ज दाखल करावा. या अर्जा मध्ये आपला MK आयडी, आणि पेमेंट चा ट्रानजॅकश्न नंबर देखील समाविष्ट करावा.

 

तसेच, आपण तक्रार अर्ज हा महाऊर्जा च्या इ मेल वर देखील दाखल करू शकता.

 

 

पेमेंट फेल झाले आणि पैसे परत मिळाले आहेत तर?

 

ज्या शेतकर्‍यांचे पेमेंट हे फेल झाले होते आणि त्यांना ती रक्कम परत मिळाली आहे त्यांनी मेडा अॅप्लिकेशन वरती लॉगिन करून नवीन पेमेंट करून घ्यावे. आणि जर पेमेंट ऑप्शन दिसत नसेल तर आपला MK आयडी आणि स्क्रीनशॉट हा महाऊर्जा ला मेल करावा. Kusum Mahaurja

 

 

महाऊर्जा जिल्हा संपर्क कार्यालय माहिती : येथे पहा

 

अधिक वाचा :

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती

error: Content is protected !!