PM Kisan Yojana: ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा | अन्यथा मिळणार नाहीत पुढील लाभ | ही शेवटची संधि

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM Kisan Yojana: देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

pm-kisan-yojana

 

 

तसेच, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (PM Kisan Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

परंतु, या योजनेअंतर्गत काही शेतकर्‍यांची काही बाबींची पूर्तता करण्याचे राहिले असून त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीयेत. तर, यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), e KYC आणि बँक खाते आधार संलग्न करणे या काही त्रुटि असल्यामुळे राज्यातील बर्‍याच शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये. (PM Kisan Yojana)

 

तर, सध्या बरेच लाभार्थी हे या योजनेच्या 14 व्या हफ्त्यापासून वंचित राहिले आहेत आणि तसेच हे लाभार्थी राज्य शासनाच्या लाभा पासून देखील वंचित राहू शकतात म्हणून शासनाने सर्व लाभार्थ्यांना खालील बाबींची पूर्तता करण्याचे सूचित केले आहे.

 

स्टेप 1 : आपले स्टेटस चेक करा

 

तर शेतकरी बांधवानो आपल्याला जर या योजनेचा हाफता मिळत नसेल तर आपण प्रथमतः खालील दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा मग आपल्या जवळील सुविधा केंद्र वरती जाऊन आपले स्टेटस चेक करावे.

 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकावा आणि Get Data वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला स्टेटस दाखविले जाईल यामध्ये तुमचे ekyc, आधार बँक खाते लिंक असले बाबत तसेच जमीन पडताळणी बाबतचे स्टेटस दाखविले जाईल. आणि जर यामध्ये काही त्रुटि असेल ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही.

 

स्टेटस पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

 

अशा प्रकारे स्टेटस दाखविले जाईल :

pm kisan status 2

 

आणि स्टेटस मध्ये जर खालील प्रमाणे त्रुटि असेल तर आपण ती खाली सुचविल्याप्रमाणे दुरुस्त करून घ्यावी

 

 

1. Land Seeding जर No दाखवत असेल तर

 

Land Seeding हे जर No दाखवत आहे म्हणजे तुमची जमीन पडताळणी ही राहिलेली आहे. तर, आपण ही त्रुटि पूर्ण करण्यासाठी आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात भेट देऊन त्रुटि पूर्ण करावी.

 

(सूचना : केंद्र शासनाने कृषि विभागाला अद्याप लॉगिन आयडी तयार करून दिला नसल्याने हे काम सध्या तहसील कार्यालयाकडेच आहे, तर आपण तहसील कार्यालय येथे भेट द्यावी)

pm kisan yojana 3

 

 

2. Aadhar Bank Account Seeding हे No दाखवत असेल तर

 

आपले स्टेटस जर आधार बँक खाते संलग्न करणे हे No दाखवत असेल तर आपण आपले ज्या बँकेत खाते आहे तेथे जाऊन आधार हे बँक खात्याशी लिंक करून घ्यावे

किंवा

आपण पोस्टमन यांच्याशी संपर्क करून पोस्ट खात्यामध्ये पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन खाते उघडावे जेणेकरून आपले आधार आणि बँक खाते हे संलग्न होईल.

 

 

3. e-KYC स्टेटस हे No दाखवत असेल तर

 

e-KYC स्टेटस हे No दाखवत असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन आधार क्रमांक टाकून आलेला ओटीपी सबमीट करून आपली kyc पूर्ण करू शकता.

किंवा

आपण आपल्या जवळील सुविधा केंद्रावरती जाऊन देखील kyc पूर्ण करू शकता, यासाठी आपल्याला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाहीये.

 

e-KYC करण्यासाठी : येथे भेट द्या

 

4. नवीन नोंदणी करणे/मान्यता देणे

 

शेतकरी हे नवीन नोंदणी ही पी एम किसान पोर्टल वर स्वतः किंवा सुविधा केंद्र वरती जाऊन करू शकतात आणि त्यास मान्यता देण्याची जबाबदारी ही तहसिलदार यांची आहे. कारण, केंद्र शासनाने अद्याप ही कृषि विभागास लॉगिन आयडी हे उपलब्ध करून दिले नाहीयेत. त्यामुळे या कामासाठी आपण तहसील कार्यालय येथे भेट देऊ शकता. (PM Kisan Yojana)

तर, वरीलप्रमाणे पद्धतीचा अवलंब करून आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. (PM Kisan Yojana)

 

 

अधिक वाचा :

* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती

* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

error: Content is protected !!