Ladki Bahin : अर्जाची परत छाननी होणार का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Ladki Bahin : राज्यात तील सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, सरकारची योजना फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर उलट तपासणी प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती समाजमध्यमावर पहायला मिळत आहे.  दरम्यान आता राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

यावरून मा. आदिती तटकरे यांनी, मी महिला व बालविकास खात्याची मंत्री असताना योजना राबवत असताना काटेकोर नियमांचे पालन करण्यात आले आहे. अर्जांची प्राथमिक छाननी करूनच आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले गेल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तर अर्जांची छाननी करण्यासाठी तक्रार यावी लागते. तशा तक्रारी आल्या आहेत की नाही, याची माहिती माझ्याकडे नाही. मी आता खात्याची मंत्री नाही. पण जर छाननी करण्याचा निर्णय झाला असेल तर तक्रारी आल्या असाव्यात आणि यावर निर्णयही विभागाचे अधिकारी घेतील. 

 

 

तसेच मा. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेवरून माहिती दिली होती. तसेच योजनेतील अर्जांच्या छाननीवरून माहिती देताना, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे. तर आम्ही दिलेल्या वचना प्रमाणे २१०० रूपये दिले जातील. पण आता या योजनेबाबत काही तक्रारी आल्या असून अर्जांची छाननी केली जाईल, असे म्हटले होते.

 

 

छाननी करताना कोणते असतील निकष? (Ladki Bahin)

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच महिला लाभार्थी दुसरी कोणती शासकीय योजनेचा लाभ घेते का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक या योजनेत आहेत का? याचा शोध घेतला जाणार आहे.

 

Tags : Ladki Bahin Yojana, ladki bahin yojana last date, mukhyamantri ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana 2024 online apply, 

 

 

 

हे पण पहा :

 

* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू

* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

error: Content is protected !!