Ladki bahin yojana update : लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी? | निधि मंजूर
Ladki bahin yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा येत आहेत.
हफ्ता मिळणार “या” दिवशी? (Ladki bahin yojana)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी 3690 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना प्राप्त नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेला 3690 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून येत्या 26 जानेवारीपूर्वी हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे या विभागाच्या मंत्री मा अदिती तटकरे यांनी सांगितले.
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
Tags : Tags : Ladki Bahin Yojana Update,