MahaDBT Farmer : निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद?? | महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना सोडत पद्धती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Farmer) वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.

 

mahadbt farmer lottery mechanization

 

परंतु, निधि अभावी राज्यात यावर्षी 25 हजार शेतकर्‍यांचे 144 कोटी रुपये अनुदान थकले असल्याची माहिती समोर येत आहे. तर, अगोदरच एवढे अनुदान वितरण बाकी असताना महाडीबीटी पोर्टल वरील नवीन सोडत काढणे शक्य नसल्यामुळे सद्यस्थिती मध्ये महाडीबीटी (MahaDBT Farmer) कृषि यांत्रिकीकरणाची सोडत थांबविण्यात आलेली आहे.

 

 

 

तसेच शेतकर्‍यांचा कल हा कृषि यांत्रिकीकरणाकडे वाढत चाललेला आहे आणि कृषि विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत मागेल त्याला कृषि यंत्र अनुदान देणेसाठी योजनांच्या निधि मध्ये चांगलीच वाढ करावी लागणार आहे आणि तसेच यांत्रिकीकरणाचा राज्य आणि केंद्र शासनाचा निधि देखील वेळेत मिळणे अवशयक आहे.

 

 

 

महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer द्वारे लाभार्थी निवड, अनुदान वितरण ही मागील वर्षी व्यवस्थित पणे झाली आणि अनुदान देखील शेतकर्‍यांना वेळीच मिळाले परंतु, या वर्षी निधि अभावी कृषि यांत्रिकीकरण योजनेत बर्‍याच शेतकरी बांधवांचे अनुदान वितरण अद्याप प्रलंबित आहे.

 

 

कृषि यांत्रिकीकरण योजनेला राज्य व केंद्र शासनाचा निधि मिळाल्यानंतरच आता पुढील सोडत होण्याची शक्यता आहे.

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!