PoCRA Notice : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मध्ये असलेल्या गावातील शेतकर्‍यांसाठी महत्वाची सूचना | तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PoCRA Notice : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 

PoCRA Notice

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA Notice) अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गावे ही प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात असून अशा गावांमधील शेतकर्‍यांना प्रकल्पातील विविध घटकांसाठी पूर्व संमती देण्यात आली होती परंतु पूर्व संमती मिळल्यानंतर देखील काही शेतकर्‍यांनी अनुदान मागणी म्हणजेच बिल/देयके ही डीबीटी अॅप्लिकेशन वरती अपलोड केले नाहीयेत.

 

 

तर, आता अशा शेतकर्‍यांना अनुदान मागणी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर. सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अर्जाचे बिल/देयके डीबीटी अॅप्लिकेशन वरती अपलोड करून अनुदान मागणी करावी अन्यथा त्यानंतर आपली पूर्व संमती ही रद्द करण्यात येणार आहे. (PoCRA Notice)

 

 

तसेच, या संदर्भातील संदेश हा सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती पाठविण्यात आला आहे. तर, सर्व शेतकर्‍यांनी पुढील 7 दिवसांत त्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेले बिल/देयके ही अपलोड करून अनुदान मागणी करावी त्यानंतर शेतकरी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज हे रद्द करण्यात येणार आहेत.

 

सर्व शेतकर्‍यांना खलील प्रमाणे संदेश देण्यात आला आहे : 

 

pocra notice (1)

 

 

हे पण पहा : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

 

 

अधिक वाचा :

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान


error: Content is protected !!