Pik Vima Notice : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
Pik Vima Notice : पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क CSC केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. (Pik Vima Notice)
राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी येत आहेत. सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते. (Pik Vima Notice)
त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही… असे कृषि मंत्री यांनी संगितले आहे.
पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क CSC केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. (Pik Vima Notice)
टोल फ्री क्रमांक:
१४४११ / १८००१८००४१७
तक्रार नोंद क्रमांक:
०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४
व्हाट्सअॅप क्रमांक: ९०८२९२१९४८
इमेल आयडी: support@csc.gov.in
#पीकविमा
#खरीपहंगाम
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
#csccentre
#टोल_फ्री