Soybean Procurement : नाफेड कडून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू | तुम्ही नोंदणी केली का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Soybean Procurement : राज्यात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी दि. 15/10/2024 मंगळवारपासून होणार असल्याचे शासनाने कळविले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील काही केंद्रावर ही खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

Soybean Procurement

 

हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने नाफेड व एनसीसीएफकडून मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 01 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यानंतर 10 ऑक्टोबरपासून मूग व उडदाची तर 15 ऑक्टोबरपासून पासून सोयाबीनची खरेदी सुरू करण्याचे नियोजन शासनाने केले होते. यामुळे राज्यातील २५५ खरेदी केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांची विक्रीपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून सोयाबीन विक्रीसाठी मोबाइल संदेश पाठविण्यात येणार आहेत.

 

 

 

राज्यात नाफेड व एनसीसीएफ या दोन केंद्रीय नोडल एजन्सींमार्फत किमान हमीदरानुसार सोयाबीनची खरेदी होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, लि. नागपूरमार्फत सध्या २५५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात नाफेडकडून १९ जिल्ह्यांत तर एनसीसीएफकडून 7 जिल्ह्यांत खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. (Soybean Procurement)

 

 

किमान आधारभूत किंमत (PSS) योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग रु. 8682, उडीद रु. 7400 व सोयाबीन रु. 4892  प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केले जाणार आहेत. (MSP Procurement PSS)

 

 

शेतकर्‍यांसाठी सूचना (Soybean Procurement)

 

शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग उडीद हमीभाव खरेदीचा लाभ घेण्याचं आव्हान मार्केट फेडरेशन केलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी आपण आपल्या तालुक्यातील तालुका पणन महासंघ कार्यालय येथे भेट देऊन खरेदी केंद्र विषयी माहिती घेऊ शकता. (Soybean Procurement)

 

 

हे पण पहा :

 

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

 

 

Tags: Soybean Procurement, nafed_nccf_procurement, pss_psf_scheme_government, price_support_scheme, hamibhav_kharedi, msp_procurement, soyabin_kharedi,

error: Content is protected !!