MahaDBT Subisdy : तुषार, ठिबक, शेततळे अनुदान वाटप करिता रु. 50 कोटी निधि उपलब्ध | या शेतकर्यांना मिळणार अनुदान
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय (MahaDBT Subisdy) उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृपि सिंचन योजना (CMSAIS) राबविण्यास दि.१९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दि. १८ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
प्रधानमंत्री कृपि सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) राज्यातील अल्प व अत्यल्प भू- धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकर्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. सदर देय अनुदानाशिवाय “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन” योजनेंतर्गत (CMSAIS) अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५ % आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे एकूण ८०% व ७५% एकूण अनुदान देण्यात येत आहे. (MahaDBT Subisdy)
तसेच “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन” योजनेंतर्गत (CMSAIS) तुषार, ठिबक पूरक अनुदान सोबत वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणे करिता देखील अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
2023-24 करिता एकूण 50 कोटी निधि उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यापैकि 10 कोटी निधि हा प्रधानमंत्री कृपि सिंचन योजनेंतर्गत तुषार, ठिबक सिंचन लाभार्थी यांना पूरक अनुदान वितरित करण्यासाठी वापरण्यात येईल आणि उर्वरित 40 कोटी निधि हा वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. (MahaDBT Subisdy)
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत तुषार आणि ठिबक साठी लाभार्थी निवड ही महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात येणार असून शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करावेत.
नक्की वाचा : ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….
तसेच, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे साठी देखील महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड करण्यात येणार असून शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावेत.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर खालील घटकासाठी इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत :
तुषार / ठिबक
वैयक्तिक शेततळे
शासन निर्णय पहा : सन 2023–24 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देणे व योजनेकरिता रू.50 कोटी निधी उपलब्ध करून देणेबाबत…
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर भेट द्या : महाडीबीटी पोर्टल
अधिक वाचा :
* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे
* आता शेतकर्यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत
* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा