PoCRA News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA गावातील शेतकर्‍यांनी लवकर ही कामे करून घ्या…अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा PoCRA) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 5142 गावांसाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला जागतिक बँकेने मदत केली होती. या योजनेंतर्गत सध्या 15 जिल्ह्यांतील गावांसाठी टप्प्याटप्याने शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. यासाठी आत्तापर्यंत तीन हजार 100 कोटींच्या वर निधी वितरित करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA अंतर्गत वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटासाठी विविध योजनांवर अनुदान वितरित करण्यात येते. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक वृक्षारोपण, पॉलिहाउस, फळबाग लागवड, शेडनेट हाउस, शेडनेटसह फ्लॉवर, रेशीम, मधमाशी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, भाजीपाला लागवड, इतर कृषी आधारित उद्योग, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट मिळते तसेच शेततळे, ठिबक संच, विहिरी,  पंप संचासाठी अनुदान देण्यात येते.

 

परंतु, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा PoCRA अंतर्गत असलेल्या गावांमध्ये आता नवीन शेतकरी अर्ज हे बंद करण्यात आले आहेत. ही योजना मार्च 2024 पर्यन्त च राहणार असून पोकरा च्या पुढील टप्प्यांमध्ये नवीन गावे निवडण्यात येणार आहेत.

 

पोकरा PoCRA नवीन अर्ज बंद?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत असलेल्या गावांमध्ये आता नवीन शेतकरी अर्ज हे बंद करण्यात आले आहेत. फक्त काही घटकांचे अर्ज हे सद्य स्थिति मध्ये सुरू आहेत त्यासाठी जे शेतकरी इछुक असतील त्यांनी अर्ज करून घ्यावेत.

PoCRA पूर्व संमती मिळालेले अर्ज?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA  अंतर्गत असलेल्या गावांमध्ये ज्या शेतकर्‍यांना पूर्व संमती मिळाली आहे त्यांनी लवकर घटक खरेदी करून बिल डीबीटी पोर्टल वर आपलोड करून घ्यावे आणि अनुदानाची मागणी करावी. कारण, पोकरा प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व पूर्व संमती अर्ज देखील रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदान मागणी लवकर करून घ्यावी.

लवकरच राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोकरा 2.0) PoCRA होणार सुरू

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी 6000 कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project) दुसरा टप्पा (पोकरा 2.0)  राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली होती.

दुसऱ्या टप्प्यातील (पोकरा 2.0) योजना मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणार असून विदर्भातील 8 जिल्हे तर मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांसाठी ही योजना राबविण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी २.० (पोकरा 2.0) योजनेचा दुसरा टप्पा 5220 गावांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी एप्रिल 2023  

* कृषि विभाग भरती जाहिरात पहा

error: Content is protected !!