Mahamesh Scheme : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ | ऑनलाइन अर्ज, पात्रता, मिळणारे लाभ सर्व माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ Mahamesh Scheme :

Mahamesh Scheme
Mahamesh Scheme

महामेष योजना मार्गदर्शक सूचना  महामेष योजना 

 

(अ) शासननिर्णय क्रमांक – पविआ-१० १७/ प्र. क्र. ६५/ पदुम-३ दिनांक- ०२/०६/२०१७ नुसार, राजे यशवंतराव होळकर महामेष (Mahamesh Scheme) योजना या नावाने ६ मुख्य घटकांसह नवीन योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

 

(ब) सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभार्थी निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करावयाचे आहे. या करिता ऑनलाइन (Mahamesh Scheme) पद्धतीने पोर्टल वर अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविणे, त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया राबविणे तसेच योजनेची अंमलबजावणी करावयाच्या कार्यवाही बाबत खालीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात येत आहे:-

 1. सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) याच प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असून या योजनेमध्ये खालील प्रमाणे ६ मुख्यघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(1) स्थायी आणि स्थलांतरित मेंढीपालन करणार्‍या मेंढीपालकांना पायाभूत सोई – सुविधेसह २० मेंढया व १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे

(2) सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करण्यात येणार(केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थींकरिता)

(3) मेंढी पालनासाठी पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणेकरिता ७५% अनुदान. ( केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्य करिता)

(4) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य चारा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान. (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्य करिता)

(5) कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.

6) पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

 

 

महामेष योजना अनुदानित घटक आणि अनुदान

MAHAMESH 1

 

MAHAMESH 2

 

MAHAMESH3

 

 

 

 

 

लाभार्थी निवडीचे निकष/ अटी आणि  शर्ती

 

 1. महामेष योजना ही केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
 2. महामेष योजना मध्ये लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
 3. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता (३०%) व अपंगांकरिता (३%) आरक्षण द्यावे.
 4. महामेष योजने अंतर्गत भटक्‍या जमाती (भज – क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
 5. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करावे.
 6. ज्या लाभधारकांना या पूर्वी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही.
 7. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत मागील तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत परत अर्ज करता येणार नाही.
 8. एका कुटुंबातील एका च व्यक्तीस अर्ज करता येईल.
 9. स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वत: ची जागा असणे आवश्यक राहील.
 10. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक किवा शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावेत.
 11. घटक निहाय प्राप्त अर्ज विचारात घेऊन योजनेचे उधीष्ट महामंडळामार्फत निश्चित करण्यात यावे.

 

 

 

महामेश ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याबाबतची अर्जदारांनी करावयाची कार्यवाही

योजनेअंतर्गत अर्जदारास फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करता येणार नाही. ऑनलाइन पद्धतीने www.mahamesh.in (Mahamesh Scheme) या महामंडळाचे संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

महामेष वेबसाइट (Mahamesh Scheme) वरून अर्ज करण्याची पध्दत :

१. अर्जदारांनी योजनेचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड दिलेल्या करावयाची नसून संगणकीय सॉफ्टवेअरव्दारे  random  पद्धतीने (लॉटरी) निवड झाल्यानंतर दिलेल विहित कालावधीत विहित केलेली कागदपत्रे विहित वेळेत ऑनलाइन अपलोड करावयाची आहे.

२. अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता www.mahamesh.in (Mahamesh Scheme) हे महामंडळाचे संकेतस्थळ ओपन करावयाचे आहे.

३. अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम वरील संकेतस्थळावर जाऊन महामेष योजनेची लिंक ओपन करावी.

४. अर्ज भरण्याबाबतची माहिती दर्शविणारा व्हिडिओ व युजर म्यान्युयल बाबतची लिंक संकेतस्थळावर

उपलब्ध करून देण्यात येईल, अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी याबाबतची माहिती काळजीपूर्वक बघून व वाचून त्याप्रमाणे प्रमाण अर्ज भरण्यात यावा.

 

महामेष ऑनलाइन अर्ज साठी संकेतस्थळ : येथे भेट द्या

महामेष मार्गदर्शक सूचना पहा : येथे पहा

महामेष कागदपत्रे नमूना : येथे पहा

 

अधिक वाचा :

* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा

* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी एप्रिल 2023  

error: Content is protected !!