VNMKV Kharip Melava : 18 मे 2024 रोजी विद्यापीठ निर्मित सत्यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2024
VNMKV Kharip Melava: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 52 वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन विस्तार शिक्षण संचालनालय VNMKV Kharip Melava आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे आयोजन गुरूवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठातील सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्य अतिथी म्हणुन मा. श्री सुनील चव्हाण, सचिव, मृद व जल संधारण हे उपस्थित राहणार आहेत.
दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीची VNMKV Kharip Melava सुरूवात करण्यात येणार असुन यात सोयाबीन पिकातील एमएयुएस-१६२ (MAUS – 162), एमएयुएस-१५८ (MAUS – 158) आणि एमएयुएस-७१ (MAUS – 71), एमएयुएस-६१२ (MAUS – 612) जातीचे बियाणे उपलब्ध असुन या बियाण्याची २६ किलो बॅगची किंमत 2600 रूपये आहे. एमएयुएस-725 (MAUS – 725 ) 5 किलो बॅग ची किंमत 500 रुपये आहे. तसेच तुर पिकात बीडीएन-७१६ (लाल) व बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाच्या ६ किलो बॅगची किंमत 1500 रूपये असुन बीडीएन-१३-४१ (गोदावरी) (पांढरी) या वाणाची २ किलो बॅगची किंमत 500 रूपये आहे. ज्वारी मध्ये परभणी शक्ती या जैवसंपृक्त वाण ४ किलो बॅगाची किंमत 500 रूपये असुन मुगाची बीएम-२००३-२ या वाणाची ६ किलो बॅगची किंमत 1320 रूपये आहे. तर, ज्या शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करावयाचे आहे त्यांनी खरीप मेळाव्यास उपस्थित राहावे.
बियाणे दरपत्रक VNMKV Kharip Melava