Ativrushti Anudan : नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी
Ativrushti Anudan : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे की जून 2020 पासून 2020, 2021 आणि 2022 या तिन्ही वर्षांमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्यापही अनुदान वाटप न झालेल्या अनुदाना पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यामध्ये सन 2020 ,2021 आणि 2022 मध्ये अतिवृष्टी या तिन्ही वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी वाटप देखील करण्यात आला होता परंतु हा निधी वाटप करत असताना करोनाच्या कालावधीमध्ये हे बऱ्याच साऱ्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना निधीच वाटप करण्यात आलेला नव्हता बरेच सारे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले नव्हते.
यासाठी जून 2023 मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 403 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन 2022 मधील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदान आज वितरण करण्यात आलेलं होतं परंतु यानंतर देखील 2020, 21 ,22 मधील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं 2023 मध्ये पण तीच परिस्थिती होती अशा या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरित करण्यासाठी अखेर आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 106 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे (Ativrushti Anudan)
कोणत्या विभागाला तसेच जिल्ह्याला किती निधी मिळाला याची माहिती पुढील जीआर मध्ये आहे Ativrushti Anudan
अधिक वाचा :
* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा
* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान