VNMKV Seeds : 18 मे 2023 रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय VNMKV Seeds आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे आयोजन गुरूवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्‍य अतिथी म्‍हणुन अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.

 

 

VNMKV seeds soyabin tur moong SEED
vnmkv seeds

 

 

दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीची VNMKV Seeds सुरूवात करण्‍यात येणार असुन यात सोयाबीन पिकातील एमएयुएस-१६२ (MAUS – 162), एमएयुएस-१५८ (MAUS – 158) आणि एमएयुएस-७१ (MAUS – 71) जातीचे बियाणे उपलब्‍ध असुन या बियाण्‍याची २६ किलो बॅगची किंमत ३९०० रूपये आहे. तसेच तुर पिकात बीडीएन-७१६ (लाल) व बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाच्‍या ६ किलो बॅगची किंमत १०५० रूपये असुन बीडीएन-१३-४१ (गोदावरी) (पांढरी) या वाणाची २ किलो बॅगची किंमत ३५० रूपये आहे. ज्‍वारी मध्‍ये परभणी शक्‍ती या जैवसंपृक्‍त वाण ४ किलो बॅगाची किंमत ४०० रूपये असुन मुगाची बीएम-२००३-२  या वाणाची ६ किलो बॅगची किंमत १०८० रूपये आहे. तर, ज्या शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करावयाचे आहे त्यांनी खरीप मेळाव्यास उपस्थित राहावे.

 

 

 

विद्यापीठ निर्मित बियाणे आणि त्याची विक्री किंमत VNMKV Seeds

 

vnmkv seed rate

 

 

कृषि विद्यापीठ खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2023

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!