VNMKV: कृषि विद्यापीठ खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2023 | VNMKV Kharip Melava 18 May 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 51 वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष (VNMKV Kharip Melava) आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मे 2023, वार गुरुवार रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी 11.00 वाजता खरीप पिक परिसंवादाचे म्हणजेच खरीपहंगाम पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

vnmkv kharip melava
VNMKV Kharip Melava

 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे राहणार असून उदघाटक तथा मुख्य अतिथी म्हणुन अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक प्रा. इंद्रजीत चौबे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी गीर गोशाळेचे अध्यक्ष गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. (VNMKV Kharip Melava)

 

 

           परिसंवादात/मेळाव्यात (VNMKV Kharip Melava) विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड, सोयाबीन, कापुस, ज्वारी, बाजरी, कडधान्य लागवड, भरड धान्याचे महत्व, किड – रोग व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्या कृषी विषयक विविध शंकाचे निरासरण करणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीस सुरूवात होणार आहे.

 

 

          दरम्यान, सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण (VNMKV Kharip Melava)  https://www.youtube.com/VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार असून परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे यांनी केले आहे.

 

 

कार्यक्रमाचा तपशील

 

 

दिनांक : 18 मे 2023, वार गुरुवार

वेळ : सकाळी 11:00 वा.

स्थळ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृह

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

error: Content is protected !!