E-Peek Pahani : ई-पीक पाहणी नाही केल्यास मदतीपासून राहाल वंचित ? या तारखेपूर्वी करून घ्या आपली पीक पाहणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

E-Peek Pahani : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.

 

E Peek Pahani

 

राज्यामध्ये ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) उपक्रम हा दिनांक 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये राबविण्यात येत आहे. तर, शेतकरी हे दिनांक 01 ऑगस्ट पासून आपल्या पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत. यासाठी त्यांना नवीन अद्ययावत ई-पीक पाहणी अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

 

 

ई पीक पाहणी का करावी? (E-Peek Pahani)

 

ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत हे त्यावर्षी पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. यावर्षी ज्या प्रमाणे सोयाबीन कापूस अनुदान देण्यात येत आहे त्याप्रमाणे जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.

 

 

तसेच, ई-पीक पाहणी ही शासनाचे अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज, विविध योजना साठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

 

 

ई-पीक पाहणी मुदत?

 

राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 करिता ई-पीक पाहणी ही दिनांक 01 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे. तर शेतकरी हे 01 ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर पर्यन्त पीक पाहणी करू शकतील.

 

 

कोठे करायची ई-पीक पाहणी नोंद?

 

प्रथम आपल्याला अद्ययावत ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) अॅप्लिकेशन हे मोबाइल वरती डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये नाव, गाव, गट क्रमांक, अशी माहिती टाकून शेतातील पिकांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे.

 

 

अद्ययावत अॅप्लिकेशन डाऊनलोड करा?

 

दिनांक 01 ऑगस्ट पासून नवीन ई-पीक पाहणी अॅप्लिकेशन हे गूगल प्ले स्टोर वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करून आपण ई-पीक पाहणी करू शकता.

 

अप्लिकेशन : डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

 

error: Content is protected !!