PM Kisan 22nd Installment : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून सर्व पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 18 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा 22 वा हफ्ता हा 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05:00 वा. गुवाहाटी, आसाम येथील समारंभात वितरीत होणार आहेत. (PM Kisan 22nd Installment)
पी एम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 13 मार्च 2026 रोजी रक्कम रुपये 1967 कोटींहून अधिक रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (DBT) थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
