E peek pahani : रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत ही जवळ येत असून अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी केलेली नाही. ७/१२ उताऱ्यावर पीक नोंद न झाल्यास पीकविमा, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (E Peek Pahani)
दिनांक १ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःच्या ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद अँड्रॉइड मोबाईलद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र, २४ जानेवारी 2026 ही रब्बी पिकांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत जवळ येऊनही मोठ्या प्रमाणावर क्षेत्र अजून नोंदणीबाहेर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. (E Peek Pahani)
रब्बी हंगामातील पीक पाहणी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातील सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली आहे. E peek pahani
राज्यात रब्बी हंगामात शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी १५ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच त्या नंतर दहा दिवस मुदत वाढ देण्यात आली होती. तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीला १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु डीसीएस अॅपमधील विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. त्यामुळे पीक पाहणीला मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. E peek pahani
तर, आता राज्य सरकारने पीक विमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती आणि हमीभाव खरेदीसाठी पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे. सध्या राज्यात हरभरा आणि तूरची हमीभाव नोंदणी सुरु आहे. त्यासाठी पीक पाहणी आवश्यक आहे. पीक पाहणीशिवाय नोंदणीला अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे आता ३१ मार्च २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. E peek pahani
ई-पीक पाहणी का महत्त्वाची? E Peek Pahani
>> ७/१२ उताऱ्यावर अधिकृत पीक नोंद सुनिश्चित होते
>> पीकविमा व नुकसानभरपाईसाठी आधार मिळतो
>> कृषी योजनांचा लाभ सुलभ होतो
>> नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीची प्रक्रिया जलद होते
ई-पीक पाहणी न केल्यास होणार मोठे नुकसान?
ई-पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, ती शेतकऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेशी थेट जोडलेली आहे. जर ७/१२ उताऱ्यावर पीक नोंद झाली नाही, तर संबंधित पीकपेरा कोरा राहतो आणि तो नंतर भरता येत नाही.
परिणामी, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, विविध शासकीय अनुदाने व योजना यांचा लाभ मिळण्यात मोठे अडथळे येऊ शकतात. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक पीक नोंद हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी ढाल ठरते.
आपल्या गावातील सहाय्यक यांच्याकडून आजच नोंद करून घ्या?
>> ई पीक पाहणी सहाय्यक हे महसूल/तहसील कार्यालय यांच्याकडून प्रत्येक गावात त्याच गावातील एक व्यक्ति नेमलेली असते. ज्यांना आपल्या गावातील पीक पाहणी सहाय्यक कोण आहेत माहिती नसेल त्यांनी आपल्या गावच्या तलाठी किंवा पोलिस पाटील यांना संपर्क करून माहिती घ्यावी.
>> 31 मार्च पूर्वी आपली ई पीक पाहणी सहाय्यक यांच्या कडून करून घ्यावी.
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
