Posted in

Farmer ID For Karjmafi : कर्जमाफी साठी फार्मर आयडी अनिवार्य? | काढला नसेल तर “या” तारखेपर्यंत काढून घ्या?

Farmer id for karjmafi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Farmer ID For Karjmafi : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोठी योजना राबवण्याची शासन दरबारी तयारी सुरू आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या आधारेच शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल २२ ते २७ हजार कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. (Farmer ID For Karjmafi)

 

परंतु, २ लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ‘अॅग्रीस्टॅक’ फार्मर आयडी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे चर्चेने जोर धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेतर्गत शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. (Farmer ID For Karjmafi)

 

शेतकरी कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या, पिकांच्या नोंदी डिजिटल करण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रकल्प राबवला आहे. राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ३२ लाख ८० हजार ७८४ खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. तर अद्यापही सुमारे ३०-३५ लाख खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी. (Farmer ID For Karjmafi)

 

त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींना आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा.  

 

हे पण पहा :

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर

* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार

* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

error: Content is protected !!