Fodder Seeds Distribution : प्रशांत महासागरात एल – निनो ही हवामान विषयक प्रणाली सक्रीय होऊन राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्यात २०० कोटी रुपयांचे चारा पिकांच्या बियाणांचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे. (Fodder Seeds Distribution)
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अंतर्गत संभाव्य चारा टंचाई गृहीत धरून एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत ४,००० रुपयांचे चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने महाबीजला या बाबतची तोंडी मागणी कळविण्यात आली आहे. 5 मे पूर्वी अधिकृत मागणी नोंदविली जाणार आहे. Fodder Seeds Distribution
पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा विकास निधीतून सरासरी सहा ते दहा कोटी रुपये चारा पिकांसाठी राखीव ठेवण्याची सूचना दिली आहे. गतवर्षी ६० कोटी रुपयांचे चारा बियाणे महाबीजने उपलब्ध करून दिले होते. यंदा २०० कोटी रुपयांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीसह धरणे, तलाव आणि जलाशयांच्या बुडीत क्षेत्रात (बॅक वॉटर) पेरणी करता येणार आहे. Fodder Seeds Distribution
शेतकर्यांना किती मिळणार लाभ?
एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत ४,००० रुपयांचे चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कुठे मिळणार बियाणे ?
चारा बियाणे हे शेतकर्यांना पशुसंवर्धन विभागा मार्फत देण्यात येणार आहे. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत कळविण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सात बारा उतारा
- होल्डिंग
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर

