HSC 12th Result 2026 : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे कारण, बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता सर्वात आधी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उद्या २ मे रोजी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कुठे पाहायचे याची वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी ) लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. बारावीच्या निकालाबद्दल चर्चा सुरू असतानाच आता बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल २ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या परीक्षांसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. HSC 12th Result 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) घेतलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. HSC 12th Result 2026
कोणत्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल?
- https://hscresult.mkcl.org निकाल पहा
- https://hscresult.mahahsscboard.in निकाल पहा
- https://results.digilocker.gov.in निकाल पहा
- https://mahahsscboard.in निकाल पहा
- https://results.targetpublications.orgनिकाल पहा
- https://results.navneet.com निकाल पहा
बारावीचा निकाल कसा पाहायचा?
>> अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
>> “HSC Examination Result” लिंकवर क्लिक करा.
>> Seat Number / Roll Number टाका.
>> आईचे पहिले नाव लिहा.
>> “View Result” वर क्लिक करा.
गुणपडताळणीसाठी ‘येथे’ अर्ज करा
या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी 3 मे ते 17 मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांचा छायाप्रतींसाठी ॲानलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. HSC 12th Result 2026
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?

