Mobile Broadcast Alert : २ मे २०२६ रोजी देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजू शकतो. यामध्ये घाबरण्याचं कोणतेही कारण नाही. सरकारने हा एक सुरक्षेचा पर्याय म्हणून निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सरकार नवीन मोबाईलवरच्या डिजास्टर अलर्ट सिस्टीमचे परिक्षण (Testing) करणार आहे. याचा वापर एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी होणार आहे तर त्याचे हे ट्रायल असेल. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. Mobile Broadcast Alert
सरकार एक महत्वाची चाचणी करणार आहे. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण एकत्र येऊन ‘सेल ब्रॉडकास्ट सिस्टम’ची टेस्टींग करणार आहेत. भविष्यात जर कधी भूकंप आला, वीज पडली, त्सुनामी किंवा गॅस लीकसारख्या गंभीर आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचावी यासाठी ही व्यवस्था केली आहे. Mobile Broadcast Alert
२ मे रोजी हा इमरजन्सी अलर्ट फक्त त्या मोबाईलवर येईल, ज्यामध्ये काही विशिष्ट सेटिंग्स ऑन असतील. अलर्ट आल्यावर मोबाईलवर मोठा आवाज आणि मेसेज दिसेल. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही OK बटण दाबून तो अलर्ट बंद करू शकता. Mobile Broadcast Alert
याआधी सरकारने आपत्तीच्या अनेक सूचना SMS च्या माध्यमातून पाठवल्या आहेत. पण काही वेळा नेटवर्क समस्येमुळे हे मेसेज नागरिकांपर्यंत उशीरा पोहोचत होते किंवा काहींपर्यंत ते पोहोचतच नव्हते. त्यामुळेच ‘सेल ब्रॉडकास्ट’ ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे एकाच विशिष्ट भागातल्या सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट पोहोचवला जाऊ शकतो.
जर मोबाईलचं नेटवर्क गेलं असेल तरीही हा अलर्ट तुम्हाला मोबाईलच्या टॉवरकडून फोनपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत कोणतीही माहिती वेळेवर मिळणं शक्य होईल. या सिस्टीमचे नाव SACHET असे असेल.
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
