Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026 : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी (प्रत्येकी १ लाख, एकूण ५ लाख रुपये , ३ वर्षांचा विमा ६० हजार १८० रुपये, शेड बांधकाम साठी ३ लाख आणि उपकरणांसाठी (कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्कींग मशीन, सोलर इ.) २ लाख ७५ लाख असे मिळून सुमारे ११ लाख ३५ हजार प्रकल्प साहित्य दिले जाणार आहे.
या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो. पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम दिली जाते, तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते. (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026)
या योजनेत, सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान मिळते. तसेच दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असून, या योजनेमुळे लाभार्थींना दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळवून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे. (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026)
योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देऊन अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि वनहक्क धारकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. तसेच संकरित जनावरांच्या माध्यमातून स्थिर उत्पन्न मिळवून देणे हा आहे.
योजनेचे फायदे
>> या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी, विमा, शेड आणि उपकरणांसाठी एकूण ११ लाख ३५ हजार रुपयांचे प्रकल्प साहित्य मिळते.
>> सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के तर अनुसूचित जाती/जमातींना ७५ टक्के अनुदान दोन टप्प्यात डीबीटीद्वारे मिळते
>> दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण उपलब्ध आहे.
>> जनावर मृत झाल्यास विम्याच्या रकमेतून नवीन दुधाळ जनावर पुरवले जाते.
>> सोलर ३ किलोवॅट, मिल्कींग मशीन, कडबाकुट्टी यंत्रासह आधुनिक उपकरणेही मिळतात.
योजनेची पात्रता व अटी
>> या योजनेत सर्वप्रथम अत्यल्पभूधारक (१ हेक्टरपर्यंत), त्यानंतर अल्पभूधारक (१–२ हेक्टर), तसेच वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो.
>> लाभार्थ्याकडे किमान १ एकर स्वतःची जमीन असावी किंवा ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा. (वनहक्क धारकांसाठी ही अट लागू नाही)
>> पशुपालन/दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा २ वर्ष अनुभव.
>> वाटप होणारी जनावरे HF, जर्सी, गीर, सहीवाल इ. असतील; ती १-२ महिने पूर्वी वेली आणि दुसऱ्या/तिसऱ्या वेतातील असावीत.
>>निवडी नंतर १ महिन्यात शेड व साधनसामुग्री खरेदी करावी; न केल्यास यादीत शेवटचा क्रमांक मिळेल.
>> प्रकल्प किंमतीपेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याला उचलावी लागते.
>> जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी बंधनकारक राहील.
>> तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांच्या शेड निर्मिती, साधनसामुग्री व जनावर खरेदीचा अहवाल (खरेदी पावती, छायाचित्रे, बँक तपशील, विमा) जिल्हा उपायुक्तांना सादर करतील. Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026
आवश्यक कागदपत्रे
>> स्वतःच्या नावे ७/१२ उतारा किंवा कमीतकमी ५ वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार.
>> वनहक्क धारकांसाठी ७/१२ वर इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकारीकडून अनुसूची “जे” प्रमाणपत्र.
>> पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्ष अनुभव प्रमाणपत्र (स्थानिक पशुवैद्यक/दुध संस्थेकडून); नसल्यास प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र.
>> दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र.
>> महिला बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र.
प्रकल्प आणि अनुदान किती?
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना ५०% ते ७५% अनुदान (काही तंत्रज्ञानावर १००%) देते. प्रकल्प खर्च आणि अनुदान (अंदाजे):
दुग्धव्यवसाय (५ गायी/म्हशी)
एकूण प्रकल्प खर्च: ₹११.३५ लाख
सर्वसाधारण: ५०% = ₹५.६७ लाख अनुदान
SC/ST: ७५% = ₹८.५१ लाख अनुदान
(शेड + जनावरे + उपकरणे समाविष्ट)
शेळी-मेंढीपालन (५० माद्या + ५ नर)
एकूण खर्च: ₹११.३८ लाख
अनुदान: वरीलप्रमाणे ₹५.६९ लाख / ₹८.५४ लाख
कुक्कुटपालन (५००० अंडी देणारे पक्षी)
एकूण खर्च: ₹३० लाख पर्यंत
शेड + ऑटोमेशन + विमा समाविष्ट
अनुदान: ५०-७५%
अतिरिक्त सुविधा (सर्व प्रकल्पांत):
कडबा कुट्टी मशीन (₹३०,०००) – ५०/७५% अनुदान
स्मार्ट कॉलर, गोठा गेटवे – ५०%
हायड्रोपोनिक चारा, मिनी टीएमआर उपकरण
पशुविमा (पूर्ण कव्हर)
१००% अनुदानावर चारा बियाणे
अर्ज प्रक्रिया
या योजनेच्या लाभासाठी लाभार्थींनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज सादर करावा. प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्य क्रमाने निवड होईल. निवडी नंतर १ महिन्यात शेड, साधनसामुग्री व जनावरे खरेदी करावीत. खरेदी अहवाल (पावती, फोटो, बँक तपशील, विमा) सादर करून पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदान मिळेल. त्यानंतर जनावर खरेदीनंतर दुसरा टप्प्यात संपूर्ण अनुदान डीबीटीद्वारे बँक खात्यात पारदर्शकपणे जमा होणार आहे. (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026)
सद्यस्थिती या योजनेचे अर्ज स्वीकारण्या साठी ऑनलाइन पोर्टल सुरु केलेले नाही तसे पोर्टल सुरू झाले तर आपणास कळविण्यात येईल तरी आपण आपल्या तालुक्यातील तालुका पशूसंवर्धन कार्यालय येथे ऑफलाइन अर्ज सादर करावा.
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
