Farmer ID for Fertilizers : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांचे वितरण केले जाते परंतु आता या अनुदानित खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळख क्रमांक) चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री मा दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली फार्मर आयडीसह इतर विषयांवर ऑनलाईन बैठकीप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. Farmer ID for Fertilizers
ॲग्रीस्टॅक (Agristack) योजनेअंतर्गत फार्मर आयडीचा (शेतकरी ओळख क्रमांक) वापर करून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे खतांचे वितरण अधिक नियोजनबद्ध, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होणार असून, शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीने मिळणार आहे. तसेच बनावट व्यवहारांना आळा बसून प्रणाली अधिक विश्वासार्ह होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणात फार्मर आयडी (Farmer ID for Fertilizers) तयार करण्यात आल्याबद्दल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्री मा दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन केले.
तसेच, केंद्रीय मंत्री यांनी पुढील काळात सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा (शेतकरी ओळख क्रमांक) वापर वाढविण्याच्या सूचना दिल्या असून, महाराष्ट्राचा हा उपक्रम इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. Farmer ID for Fertilizers
खरीपासाठी खते हवी असतील तर ?
या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामा साठी खते मिळवण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID for Fertilizers) आवश्यक असणार आहे तर, ज्या शेतकर्यांनी अद्याप फार्मर आयडी काढला नसेल तर त्यांनी तात्काळ आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा जेणेकरून पुढील गैरसोय टाळता येईल.
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
