Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात आज दिनांक ०२ एप्रिल २०२६ आणि उद्या गारपीटीचा अंदाज आहे. तर पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
आज दिनांक ०२ एप्रिल २०२६ राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, मराठावाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
उद्या दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोकण, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दिनांक ०४ एप्रिल २०२६, शनिवारी राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. Maharashtra Weather Update तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दिनांक ०5 एप्रिल २०२६, रविवारी गोंदीया आणि गडचिरोली, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वादळी पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी पूर्व विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. – IMD PUNE Maharashtra Weather Update
शेतकर्यांनी काळजी घ्यावी?
शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांची / धान्याची विशेष काळजी घ्यावी तसेच काढणी झालेले शेतमाल झाकून योग्य ठिकाणी ठेवावा. सर्व शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वीजेपासून स्वतः चे आणि कुटुंबाची, पशुधनाची काळजी घ्यावी. पाऊस / विजा पडत असताना झाडाखाली थांबू नये.
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
