Mahavitaran : शासनाकडून आजघडीला सौर ऊर्जेवर अधिकाधिक भर दिला जात असून, यासाठीच नवनवीन योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना सौर ऊर्जा यंत्रणा बसवून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शासनाकडून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असतानाही कित्येक जणांना आजही महावितरणच्या या सौर ऊर्जा योजना व उपक्रमांबाबत माहिती नसल्याने ते यापासून दूरच आहेत. Mahavitaran
अशात जास्तीत जास्त नागरिकांना सौर ऊर्जा वापरावर माहिती व्हावी व त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे लगेच निवारण करता यावे, यासाठी महावितरणकडून विशेष जनजागृती व तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. Mahavitaran
शासनाकडून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कित्येकांना आजही सौर ऊर्जेचे किती लाभ आहेत, याची माहिती नसून कित्येकांच्या तक्रारी असल्याने ते याकडे धजावत नाहीत.
अशात नागरिकांमध्ये सौर ऊर्जा जनजागृती व्हावी, तसेच त्यांच्या तक्रारींचे लगेच निवारण करता यावे, यासाठी महावितरणकडून उपविभाग स्तरावर जिल्हा/तालुका ठिकाणी सौर जनजागृती व तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. Mahavitaran
या तक्रारींचे निवारण करण्यात येणार?
शिबिरात पंप कार्यरत नसणे, पूर, माकड किंवा इतर कारणांमुळे सोलार पॅनल-पंपचे नुकसान, सोलार पॅनल किंवा पंप चोरीस जाणे, पाणी उचल प्रणाली कार्यरत नसणे, संपूर्ण रक्कम भरूनही पंपाची स्थापना झालेली नसणे आदी तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
सौर कृषी पंप त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मात्र, त्यात शेतकऱ्यांना काही समस्या आल्यास व त्याचे वेळीच निराकरण न झाल्यास शेतकरी नाराज होतात. अशात शेतकऱ्यांना प्राथमिक देऊन त्यांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करता यावे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौर कृषी पंपाकडे वळतील, हा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे.
तुमच्या जिल्ह्यात कधी आहे शिबीर?
तर, महावितरणकडून उपविभाग स्तरावर जिल्हा/तालुका ठिकाणी सौर जनजागृती व तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आपण आपल्या तालुक्यातील महावितरण कार्यालय किंवा आपले लाइन मन यांच्याशी संपर्क करून शिबिराचे दिनांक व ठिकाण जाणून घेऊ शकता.
कोणत्या तक्रारी घेऊन जाऊ शकतो?
तक्रार निवारण शिबिरात पंप कार्यरत नसणे, पूर, गारपीट, वादळ वारा, माकड किंवा इतर कारणांमुळे सोलार पॅनल-पंपचे नुकसान, सोलार पॅनल किंवा पंप चोरीस जाणे, पाणी उचल प्रणाली कार्यरत नसणे, संपूर्ण रक्कम भरूनही पंपाची स्थापना झालेली नसणे आदी तक्रारींचे निवारण या शिबिरा मध्ये करण्यात येणार आहे.
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
