Posted in

Dubar Perni : दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

Dubar perni
1/5 - (1 vote)

Dubar Perni : शेतकर्‍यांसाठी दिलासा दायक बातमी येऊन धडकली आहे. राज्यातील अनेक भागात शेतकर्‍यांनी पेरणी केली पण बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे . शेतकरी आसामानी आणि कंपन्यांच्या संकटांमुळे नागवला जात आहे. त्यातच महायुती सरकारने त्यांच्यासाठी एक मोठी दिलासा दायक बातमी समोर आणली आहे. दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार आहे. याविषयीची मोठी घोषणा आज महसूल मंत्री यांच्याकडून करण्यात आली आहे.  

 

महसूल मंत्री यांनी मध्यामांशी बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, बोगस बि बियाणे पेरले की ते उगवत नाही किंवा लावलेले बियाणे उद्ध्वस्त होतं. शेतकर्‍यांवरील हे संकट पाहता, इथून पुढे दुबार पेरणी करता लागणार निधी हा डीपीसीमधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Dubar Perni

 

बि-बियाणे आता सरकार उपलब्ध करून देणार आहे. दुबार पेरणी संदर्भात डीपीडीसी मधून निधी दिला जाईल. याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल. बोगस बियाणे दिले आहे त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे. Dubar Perni

error: Content is protected !!