Posted in

SIR In Maharashtra : असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

Sir in maharashtra process
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.7/5 - (3 votes)

SIR In Maharashtra : महाराष्ट्रासह देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण (SIR) सूरू आहे. यामध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) हे  तुमच्या थेट घरी येऊन तुम्हाला अर्ज देणार आहेत आणि तो गोळा देखील करणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया 29 जुलै 2026 आधी पुर्ण करायची आहे.त्यामुळे कमी कालावधी असल्याने नागरीकांची बीएलओच्या कार्यालयात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेकांच्या मनात याबाबत अनेक शंका आहेत. त्याचसोबत SIR चा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा? हे आपण आज जाणून घेऊयात. SIR In Maharashtra

 

मोहिमेचा उद्देश?

 

या मोहिमेचा मुख्य उद्देश इतकाच आहे की मतदार याद्या अचूक करणे, यामध्ये पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जातील, तर अपात्र मतदार अर्थात बोगस मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.त्यामुळे या मोहिमेला खुप महत्व आहे. SIR In Maharashtra

 

या मोहिमेमध्ये बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन माहिती गोळा करून फॉर्म भरून घेतात. पण काही ठिकाणी बीएलओच्या कार्यालयात नागरीकांची गर्दी जमली आहे. पण या गर्दीतून तुम्हाला तुमची सुटका करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव कोणत्या यादीत आहे? त्या यादीचा नंबर शोधणे गरजेचे आहे.कारण यादीनुसार वेगवेगळे बीएलओ नेमले गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला यादीनंतर माहित असणे गरजेचे आहे. SIR In Maharashtra

 

ECINET ॲपमधुन मिळेल यादी नंबर 

 

जर तुम्हाला यादी नंबर हवा असेल तर तुम्ही ECINET ॲप Install करा. त्यामध्ये तुम्हाला विविध पर्याय मिळतील. पण तु्म्ही सर्च युअर नेम इन वोटर लीस्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर EPIC नंबर टाकून तुम्हाला तुमची वोटर डिटेल्स मिळेल.त्यातला पार्ट नंबर या पर्यायासमोर जो नंबर लिहलेला असेल तो तुमचा यादी नंबर असेल. SIR In Maharashtra

 

Sir फॉर्म कसा भरायचा?

 

आता हा यादी नंबर घेऊन तुम्ही बीएलओकडे गेलात तर तो लगेच तुम्हाला तुमचा SIR चा फॉर्म देईल. हा फॉर्म तुम्ही घरच्या घरी भरू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो हा फॉर्म कसा भरायचा? SIR In Maharashtra

 

>> फॉर्मच्या वरच्या भागावर तुमच नाव, पत्ता आणि ओळखपत्र हे आधीच छापलेले असेल. फक्त त्या तक्त्यात तुम्हाला तुमचा आताचा पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे.

>> त्यानंतर खाली मतदाराची माहिती आणि नातेवाईकांची माहिती हा पर्याय आहे. जर तुमचं नाव SIR च्या 2002 मधल्या यादीत नाव असेल तर तुम्हाला मतदाराची माहिती हा भाग भरायचा आहे. जर नसेल तर तो भाग तसाच सोडूच द्यायचा आहे.

>> जर समजा तुमचं नाव त्या यादीत नसेल पण तुमच्या कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांची नावे त्या यादीत असेल तर अशा मतदारांनी नातेवाईकांची माहिती हा भाग भरायचा आहे.

>> त्यानंतर शेवटी सर्वात महत्वाचा भाग आहे.जो प्रत्येक मतदाराला भरावाच लागणार आहे. त्यात तुम्हाला तुमची जन्म तारीख, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, वडिलांचे नाव, आईचे नाव, आईचा EPIC नंबर, पत्नी/पतीचे नाव(लागू असल्यास), पत्नी/पतीचे EPIC क्रमांक अशी सगळी माहिती भरायची आहे. काही शंका असल्यास बीएलओला विचारल्या शिवाय भरू नका.

सगळी माहिती भरल्यानंतर शेवटी सही करायला विसरू नका आणि फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरू नका. अशाप्रकारे तुमचा फॉर्म काही मिनिटात भरला जाईल.

 

हे पण पहा :

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

 

error: Content is protected !!