Posted in

Free Electricity to Farms : शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

Free Electricity to Farms
1/5 - (2 votes)

Free Electricity to Farms  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर लागोलग शेतकऱ्यांच्या वीजबिलाची पाटी कोरी करण्याचे जाहीर केले. साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

 

महाराष्ट्र शासन राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आता दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. Free Electricity to Farms

 

सध्याच्या घडीला राज्यातील तब्बल ७६% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी सरकारने दिवसा वीज देण्याला प्राधान्य दिले आहे. Free Electricity to Farms

 

वर्षाअखेरपर्यंत सरसकट अंमलबजावणी

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर ऊर्जेच्या या योजनांचा विस्तार वेगाने केला जात आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील उर्वरित सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना दररोज दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

 

शेतकऱ्यांचे जुने थकीत वीजबील माफ!

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ शेतकऱ्यांच्या ७.५ एचपीपर्यंतचे ४८ हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केले. Free Electricity to Farms

 

हे पण पहा :

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

 

error: Content is protected !!