Chia Seeds Farming : या शेतकर्‍याने केली औषधी पिकाची यशस्वी लागवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Chia Seeds Farming : शेतकरी बांधवानो आपले शेतकरी हे नेहमी शेतामध्ये नवीन प्रयोग करत असतात तर असाच एक प्रयोग औषधी पिकाची लागवड मध्ये करण्यात आला आहे. तर, या शेतकर्‍याने चिया या औषधी पिकाची यशस्वी लागवड केली आहे.

 

Chia Seeds Farming Nanded Maharashtra

 

चिया बियाणे लागवड (Chia Seeds Farming)

 

चिया या औषधी पिकाची यशस्वी लागवड करणारे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी बालाजी महादवाड यांनी अमेरिकन चिया या औषधी पिकाची यशस्वी लागवड केली आहे. यांनी चिया पिकाची एका एकरात 7.5 क्विंटल उत्पादन मिळाल्याची माहिती दिली आहे. (Chia Seeds Farming)

 

 

चिया हे एक औषधी पीक असून हे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी च घेतले जाते. परंतु, आता बरेच शेतकरी हे या पिकाची लागवड करून पाहत आहेत. आणि असेच प्रयोग करून डोंगरगाव येथील शेतकरी यांनी एकरी 7.5 क्विंटल उत्पादन मिळविले आहे.

 

 

चिया हे 110 ते 120 दिवस कलावधीचे पीक असून या पिकास कोणताही वन्यप्राणी खात नाही किंवा याच्यापासून प्राण्यांना धोका नाही. तसेच या पिकास कोणतेही खत किंवा कीटकनाशकाची गरज लागत नाही. संबंधित शेतकरी यांनी 31 डिसेंबर रोजी या पिकाची पेरणी केली आणि 4 एप्रिल रोजी काढणी करण्यात आली असून त्यांना एकरी 7.5 क्विंटल उत्पादन झाले आहे. (Chia Seeds Farming)

 

 

बाजारपेठ (Chia Seeds Farming)

 

चिया ह्या पिकास मध्यप्रदेश मधील निमच मंडी, तसेच नाशिक आणि तुळजापूर येथे बाजार मिळतो. चिया बियाण्यास बाजारभाव हा रु. 10000 ते 20000 प्रती क्विंटल याप्रमाणे मिळतो.

 

 

अधिक वाचा :

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!