Cotton Soyabin Subsidy : सामायिक खातेदारांसाठी महत्वाची सूचना | असे ना हरकत प्रमाणपत्र दिले तरच मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (3 votes)

Cotton Soyabin Subsidy : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू आहे.

 

Cotton Soyabin Subsidy Affidavit

 

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. (Cotton Soyabin Subsidy)

 

 

सामायिक खातेदारांसाठी महत्वाची सूचना (Cotton Soyabin Subsidy)

 

 

सोयाबीन व कापूस अनुदान यादीमध्ये सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांना आता कृषि आयुक्तालयाच्या दिनांक 05 सप्टेंबर च्या पत्रिपत्रक नुसार खातेदारांचे ना हरकत पत्र अफिडेविट स्वरूपात घेणेबाबत कळविले आहे. त्यामुळे आता सामायिक खातेदारांना अनुदान मिळणे साठी अफिडेविट स्वरूपात ना हरकत हे कृषि विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.

 

 

अनुदान मिळणे साठी अफिडेविट का?

 

तर, यामध्ये ना हरकत प्रमाणपत्रावर काही खातेदार हे इतर सह हिस्सेदार यांच्या सह्या स्वतःहून करत असल्याचे क्षेत्रीय पातळीवरुन वारंवार कळविण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक खातेदार हे सर्वांचे संमती पत्र आणून देत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. त्यामुळे नक्की कोणाच्या खात्यावर संयुक्‍त खात्याची मदतीची रक्‍कम जमा करायची याबाबत प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

 

 

त्यानुषंगाने, संयुक्‍त खातेदारांच्या बाबत मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या मदतीच्या अनुषंगाने त्यांच्यापैकी एका सह हिस्सेदार यांचे नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना अफिडेविट घेतले जाते. त्या नुसार कापूस – सोयाबीन मदतीची रक्‍कम जमा करण्यासाठी इतर सर्व हिस्सेदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र “अफिडेविट” स्वरूपात घेण्यात यावे. (Cotton Soyabin Subsidy)

 

सदर संयुक्‍त खातेदार पैकी ज्याच्या नावावर रक्‍कम जमा करायची आहे, त्याने सदर अफिडेविट व त्यासोबत आधार संमती पत्र हे कृषी विभागाकडे मदत मिळण्यासाठी सादर करावयाचे आहे. या ना हरकत प्रमाणपत्र बाबतची सर्व जबाबदारी ज्याच्या नावावर लाभ जमा केला जाणार आहे त्या सह हिस्सेदार यांची राहणार आहे. तरी वरील प्रमाणे कार्यवाहीबाबत कृषि विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना सूचित करण्यात यावे असे या पत्रात कळविले आहे.

 

No. 22426 Dt. 05 Sep. 2024 Financial Assistant

 

 

अफिडेविट नमूना :

 

अनुदान मिळणे साठी अफिडेविट नमूना या ठिकाणी देत आहोत. हा नमूना माहिती स्तव सादर करण्यात येत आहे हा नमूना अधिकृत नसून फक्त माहिती साठी येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनुदान मिळणे साठी अफिडेविट नमूना कसा असावा याकरिता अधिक माहिती साठी आपण आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क करावा. (Cotton Soyabin Subsidy)

 

 

अफिडेविट नमूना : पीडीएफ pdf डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

error: Content is protected !!