Crop Damage : पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत….सरसकट भरपाई मिळेल….कृषि मंत्री
Crop Damage : राज्यातील काही भागांमध्ये दिनांक 01 आणि 02 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतातील सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय. तर, या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
परंतु, राज्याचे कृषि मंत्री हे मराठवड्यातील परभणी आणि बीड या जिल्ह्यांच्या दौर्यावर असताना पीक नुकसानीची पाहणी करत असताना पंचनामे करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला असतं त्यावेळी माननीय कृषि मंत्री यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत तर शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळेल असे संगितले. (Crop Damage)
पुढे, कृषि मंत्री म्हणाले की पंचनामे हे ज्यांच्या वस्तु किंवा जनावरे गेली आहेत यांचे पंचनामे होणार. तर, आता कृषि मंत्री यांनी दिलेल्या विधाणावरुण सर्व शेतकरी बांधवांना प्रशासन कश्या प्रकारे मदत देणार याकडे लक्ष लागले आहे.