Farmer Schemes : राज्यातील शेतकर्‍यांसाठी गुड न्यूज … आता मिळणार रु. 15000

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Farmer Schemes : देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर, त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासन देखील राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये हे तीन हाफत्यात देत आहे.

 

 

परंतु आता या योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण 12 हजार रुपयांचा निधी आता 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. (Farmer Schemes)

 

 

शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकीच अर्थात 6 हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण 15 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.’ (Farmer Schemes)

 

 

तर, आता राज्य शासन या योजनेमध्ये देण्यात येणार्‍या रकमेमध्ये कधी वाढ करणार याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष वेधले आहे.

 

 

Tags : farmer schemes, pm kisan yojana, namo yojana maharashtra government, 

 

हे पण पहा :

 

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….

* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!