Kusum Solar Pump Payment: असे करा कुसुम सोलर पंप चे पेमेंट | पैसे भरताना अडचण येत असेल तर येथे संपर्क करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Solar Pump Payment: राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते त्या अर्जाची छाननी करून जे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत त्याना सेल्फ सर्वे करण्यासाठी त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल क्रमांक वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. आणि ज्या शेतकर्‍यांचे अर्ज हे काही कारणास्तव त्रुटि मध्ये आहेत त्यांना कागदपत्रे परत अपलोड करण्याचा ऑप्शन त्यांच्या लॉगिन मध्ये देण्यात आला आहे. (Kusum Solar Pump Payment)

Kusum Solar Pump Payment

 

तर, ज्यांना सेल्फ सर्वे करण्यासाठी संदेश आला आहे त्यांनी येथे क्लिक करून स्टेप बाय स्टेप दिल्याप्रमाणे सर्वे करावा आणि सर्वे केल्यानंतर त्याची छाननी करून आपल्याला पैसे भरण्याचे ऑप्शन हे दिले जाते तर ज्या शेतकरी बांधवांनी सेल्फ सर्वे केला आहे त्यांनी खालील प्रमाणे पैसे भरणा करावा. Kusum Solar Pump Payment

 

स्टेप 1 : प्रथमतः आपण महाऊर्जा चा अॅप्लिकेशन खालील दिलेल्या लिंक वरुण मोबाइल मध्ये डाऊनलोड करा.

महाऊर्जा चा अॅप्लिकेशन

 

स्टेप 2 : अॅप्लिकेशन उघडून त्यामध्ये आपला सोलर पंप नोंदणी करिता दिलेला मोबाइल क्रमांक टाकावा

 

स्टेप 3 : त्यानंतर आपल्याला ओटीपी पाठविला जाईल तो पुढील पर्याय वरती टाकून लॉगिन व्हावे

 

स्टेप 4 : लॉगिन केल्यानंतर “अॅप्लिकेशन डिटेल्स” या पर्याय वरती क्लिक करावे

KUSUM SELF SURVEY MEDA 1 (6)

 

स्टेप 5 : आपला सेल्फ सर्वे झाला असेल तर आपल्याला पैसे भरा हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करावे

 

KUSUM SOLAR PAYMENT

 

स्टेप 6 : नंतर आपल्याला ओटीपी पाठविल्या जाईल तो टाकून आपल्याला पेमेंट पेज वरती नेले जाईल

 

स्टेप 7 : पुढे आपण आपली माहिती भरून, पेमेंट साठी डेबिट कार्ड, यूपीआय हे ऑप्शन निवडून पेमेंट करू शकता

 

KUSUM SOLAR PAYMENT 3

 

स्टेप 8 : पेमेंट झाल्यानंतर आपल्याला तसा एक संदेश आपल्या मोबाइल वरती दिला जाईल किंवा काही वेळा पेमेंट हे कन्फर्म होण्यासाठी थोडा वेळ लागतो तर वाट पहावी.

 

स्टेप 9 : त्यानंतर आपल्याला वेन्डर म्हणजे कंपनी निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

 

 

पेमेंट फेल झाले तर हे करा :

पेमेंट करत असताना काही अडचण आली आणि पेमेंट हे फेल झाले तर आपण खालील दिलेल्या आपल्या जिल्ह्यातील महाऊर्जा / मेडा कार्यालयाशी संपर्क करावा. (Kusum Solar Pump Payment)

 

clickhere-click

 

महाऊर्जा जिल्हा कार्यालय संपर्क तपशील : डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती

* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

error: Content is protected !!