Posted in

Karjamafi e-KYC : शेतकरी कर्जमाफीची e-KYC करताय? तर ही काळजी नक्की घ्या?

Karjamafi e kyc precautions
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Karjamafi e-KYC  : राज्य शासनाचे दि.०२.०६.२०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (PAHSKY) 2026 ही योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना रु.२ लाखपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. (Karjamafi e-KYC Update Karjamafi e-KYC )

 

सध्या राज्यात कर्जमाफीची यादी आली आहे आणि सर्वत्र KYC ची प्रक्रिया जोरात सुरू आहे. यादीत नाव आल्याच्या आनंदात अनेक शेतकरी घाईगडबडीत KYC करत आहेत. पण मित्रांनो, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच पुढचे पाऊल उचला.  Karjamafi e-KYC 

 

नेमकी अडचण काय आहे?

KYC करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेमध्ये मोठी तफावत (विसंगती) दिसत आहे.

उदा. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज १.५ लाख रुपये आहे, पण पोर्टलवर फक्त ६० हजार रुपये दिसत आहेत. काहींचे कर्ज २ लाख रुपये असताना पोर्टलवर १ लाख रुपयेच दाखवले जात आहेत. जवळपास २० ते २५% शेतकऱ्यांच्या बाबतीत हा गोंधळ पाहायला मिळत आहे. Karjamafi e-KYC 

 

घाईगडबडीत चुकीची KYC केल्यास काय होईल?

जर तुम्ही पोर्टलवर दाखवलेली चुकीची (कमी) रक्कम मान्य करून KYC पूर्ण केली, तर सरकारकडून फक्त तीच रक्कम माफ होईल आणि उर्वरित कर्जाची रक्कम तुम्हाला स्वतः बँकेत भरावी लागेल! त्यामुळे अजिबात घाई करू नका. Karjamafi e-KYC 

 

KYC करताना कोणती काळजी घ्यावी?

१) माहिती तपासा: KYC करताना तुमचा कर्ज खाते क्रमांक आणि पोर्टलवर दाखवलेली कर्जाची रक्कम तुमच्या मूळ रकमेसोबत व्यवस्थित तपासा.

२) माहिती बरोबर असल्यास: जर रक्कम आणि खाते क्रमांक तंतोतंत जुळत असेल, तरच ‘होय’ (Yes) या पर्यायावर क्लिक करून KYC पूर्ण करा.

३) माहिती चुकीची असल्यास: जर कर्जाची रक्कम चुकीची दाखवत असेल, तर तिथे लगेच ‘नाही’ (No) हा पर्याय निवडा.

 

रक्कम चुकीची असल्यास पुढे काय करावे?

तक्रार नोंदवा (Grievance): ऑनलाईन KYC करतानाच, रक्कम चुकीची असल्यास ‘नाही’ निवडल्यावर तुम्हाला तुमची तक्रार तिथेच नोंदवण्याचा पर्याय मिळतो. तिथे ऑनलाइन तक्रार दाखल करा. Karjamafi e-KYC 

अधिकाऱ्यांना भेटा: बँकेत, तहसीलदार किंवा उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधून ही विसंगती त्यांच्या निदर्शनास आणून द्या. (जरी कोणी अधिकारी KYC करण्यासाठी घाई करत असेल, तरी त्यांना आपली अडचण सांगा).

लोकप्रतिनिधींना सांगा: हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांचा असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कानावर ही गोष्ट घाला. मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाकडे गेल्यास नक्कीच यावर तोडगा निघेल आणि दुरुस्ती होऊन तुम्हाला नव्याने KYC करण्याची संधी दिली जाईल.

थोडक्यात सांगायचे तर .. चुकीच्या रकमेवर ‘होय’ करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आधी माहिती तपासा, जागरूक राहा आणि कोणतीही अडचण असल्यास रीतसर तक्रार दाखल करा!

 

 

error: Content is protected !!
Created with ❤