Posted in

CRA Technology : सीआरए तंत्रज्ञाने करा फळझाड लागवड | पहा सविस्तर पद्धती

Cra technology plantation of fruit trees
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

CRA Technology : हवामानातील अनिश्चितता, कमी पाऊस, वाढते तापमान आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता सीआरए (Climate Resilient Agriculture) तंत्रज्ञानाचा अवलंब करून फळबाग लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते.

 

सीआरए तंत्रज्ञान म्हणजे काय?

 

पारंपरिक सिंचनामध्ये पाणी जमिनीच्या वरच्या थरात दिले जाते. उन्हाळ्यात या पाण्याचे बाष्पीभवन होते. वरच्या थरातील पाण्यामुळे झाडांची मुळे वरच्या भागात विकसित होतात. परिणामी पाण्याच्या कमतरतेमध्ये झाडांवर ताण येतो.

 

सीआरए (CRA- Climate Resilient Agriculture – Water Root Zone Irrigation) तंत्रज्ञानामध्ये पाणी हे थेट २ ते ३ फूट खोल मुळांच्या कार्यक्षेत्रात पोचविले जाते. त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा दीर्घकाळ उपलब्ध राहून मुळे खोलवर विकसित होतात. हे तंत्रज्ञान तामिळनाडूतील आयएएस केडरचे अधिकारी डॉ. कोर्लापती सत्यगोपाल यांनी विकसित केले आहे. CRA Technology

 

सीआरए तंत्रज्ञानाची उद्दिष्टे

  • पाण्याची बचत करणे
  • खतांचा कार्यक्षम वापर करणे.
  • हवामान बदलाचा परिणाम कमी करणे.
  • मुळांच्या खोलवर वाढीस प्रोत्साहित देणे.
  • पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविणे.

 

फळझाडे लागवड कशी करायची ? 

 

खड्ड्याची तयारी

फळझाडांच्या लागवडीसाठी २ बाय २ बाय २ फूट किंवा ३ बाय ३ बाय ३ फूट आकारमानाचा खड्डा खणावा. खड्ड्याच्या तळाला मध्यभागी किंवा चारही कोपऱ्यांमध्ये पहारी अथवा स्क्रू ऑगरच्या सहाय्याने सुमारे १ फूट अतिरिक्त खोलीचे छिद्र करावे. या छिद्रामुळे पाणी आणि अन्नद्रव्ये जमिनीच्या खोल थरात झिरपतात व मुळांच्या कार्यक्षेत्रात साठून राहतात. CRA Technology

 

सेंद्रिय खतांचा वापर

काढलेल्या खड्ड्याच्या तळाशी गांडूळ खत, चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खते यांचा पुरेसा वापर करावा. या सेंद्रिय खतांमुळे मुळांच्या सानिध्यात उपयुक्त सूक्ष्मजिवांच्या वाढीस चालना मिळून त्यांची संख्या वाढण्यास मदत होते. CRA Technology

 

पीव्हीसी पाइपची मांडणी

तयार खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये ३ ते ४ इंच व्यासाचे आणि अंदाजे ३ फूट लांबीचे पीव्हीसी पाइप उभे बसवून घ्यावेत. हे पाइप कायमस्वरूपी ठेवायचे नसून वाळूचे स्तंभ तयार करण्यासाठी तात्पुरते वापरले जातात. CRA Technology

 

वाळूचे स्तंभ तयार करणे

पीव्हीसी पाइपमध्ये चाळलेली नदीची बारीक वाळू भरावी. फळझाडांची लागवड पूर्ण झाल्यानंतर पाइप अलगद बाहेर काढावेत. त्यामुळे त्या ठिकाणी वाळूचे कायमस्वरूपी स्तंभ तयार होतात. या वाळूच्या स्तंभांमार्फत पाणी आणि हवा मुळांच्या सानिध्यात जलद पोहोचविली जाते.

 

Cra plantation technology

 

पाणी देण्याची पद्धत

  • ठिबक सिंचनाचे ड्रीपर किंवा पाण्याचा पुरवठा थेट वाळूच्या स्तंभांवर करावा.
  • जेव्हा पाणी दिले जाते तेव्हा ते, जमिनीवर साचत नाही.
  • वरच्या थरात पसरत नाही.
  • थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात पोहोचते.
  • बाष्पीभवन कमी होते.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते.

 

पाणी थेट जमिनीच्या खोल थरात दिले जाते, तेव्हा झाडांची मुळेही त्या दिशेने वाढतात. त्यामुळे मुळांचे जाळे मजबूत बनते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. झाडे दीर्घकाळ पाण्याविना तग धरू शकतात.

 

 

हे पण पहा :

* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक 

* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?

* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….

* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

error: Content is protected !!