Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी (e-KYC) आणि सर्व प्रकारची पडताळणी प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची अंतिम संख्या १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातून सुमारे एकूण २ कोटी ४७ लाख महिलांनी अर्ज केले होते. मात्र, अर्ज आणि कागदपत्रांची सखोल तपासणी केल्यानंतर ८० लाख ७१ हजार ९५२ महिला अपात्र ठरल्या आहेत.
पडताळणीदरम्यान सुमारे २४ लाख महिलांनी चुकून स्वतःची नोंद ‘शासकीय कर्मचारी’ अशी केली होती. त्यामुळे त्या सुरुवातीला अपात्र ठरल्या. मात्र, सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली. या कालावधीत २४ लाखांपैकी २० लाख महिलांनी आपली माहिती दुरुस्त केली आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या. उर्वरित ४ लाख महिला मात्र निकष पूर्ण न केल्याने अपात्र राहिल्या.
पडताळणीपूर्वी या योजनेसाठी राज्य सरकारला दरवर्षी सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती. आता लाभार्थ्यांची अंतिम संख्या निश्चित झाल्यामुळे सरकारचा महिन्याचा खर्च २ हजार ४५९ कोटी रुपये इतका राहणार असून, त्यामुळे वार्षिक सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.
या महिलांचे लाभ बंद होणार?
सरकारने स्पष्ट केले आहे की, इतर कल्याणकारी योजनांप्रमाणेच या योजनेतील लाभार्थ्यांचीही वेळोवेळी पडताळणी केली जाणार आहे. योजनेच्या नियमांनुसार ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचे नाव आपोआप लाभार्थी यादीतून वगळले जाईल.
* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
