Mahamesh Yoajana : महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू | मेंढी, शेळी, कुक्कुट पालन साठी मिळणार अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (5 votes)

Mahamesh Yoajana : राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणा-या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Mahamesh Yoajana) अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिलेली आहे यामुळे पारंपारिक पद्धतीने मेंढी/शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला याचा फायदा होणार आहे. या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशूपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल आणि त्यांची आर्थिक प्रगती होईल.

 

Mahamesh Yojana

 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे धनगर व तत्सम जमातीला फायदा होत आहे. या अनुदान योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 12 ते 26 सप्टेंबर पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह 20 मेंढया आणि 1 मेंढानर अशा मेंढी गटाचे 75 टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे 75 टक्के अनुदानावर वाटप, (Mahamesh Yoajana)

 

 

मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाईल, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे. (Mahamesh Yoajana)

 

 

मेंढ्यासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या व 1 मेंढानर एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. 6 हजार असे एकूण 24 हजार चराई अनुदान वाटप केले जाईल.

 

 

मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या 75 टक्के अथवा किमान 30 वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या 75 टक्के रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. 50 हजार एवढे अनुदान दिले जाईल.

 

 

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 टक्के कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रु. 9 हजार मर्यादेत 75 टक्के अनुदान याबाबींचा समावेश आहे. सदर योजनेचे अर्ज जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांनी केलेले आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत Mahamesh Yoajana

 

यासाठी 12 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

 

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

ऑनलाइन अर्ज हा www.mahamesh.org या संकेतस्थळावर करायचे आहेत. यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती भेट द्या.

 

Mahamesh yojana apply online, Mahamesh Yojana 2024, Mahamesh yojana list, Mahamesh yojana 2024 apply online, महामेष योजना, महामेष ऑनलाइन अर्ज

 

 

 

Tags : Mahamesh yojana apply online, Mahamesh Yojana 2024, Mahamesh yojana list, Mahamesh yojana 2024 apply online, महामेष योजना, महामेष ऑनलाइन अर्ज
error: Content is protected !!