Nano Urea Nano DAP : नॅनो युरिया नॅनो डीएपी, मेटलडीहाइड सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
Nano Urea Nano DAP : शेतकरी बांधवांना अनुदांनावरती नॅनो युरिया डीएपी उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारन्यात आले होते. या ऑनलाइन अर्जंची सोडत यादी काढण्यात आली असून आता यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना हे घटक 100% अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
काय आहे नॅनो युरिया?
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास नॅनो युरिया असे म्हटले जाते. पारंपरिक युरियाला नॅनो युरिया हा पर्याय होऊ शकेल आणि 50 टक्क्यांनी युरियाचा वापर कमी होऊ शकेल.
असा होईल फायदा?
द्रवरूप नॅनो युरिया दोन टप्प्यांत थेट पिकांच्या पानांवर फवारणी करता येणार आहे. पिकांना पूर्वीसारखे जमिनीतून युरिया पोहोचविण्याची गरज राहणार नाही. द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात. (Nano Urea Nano DAP)
पारंपरिक पद्धतीत 70 टक्के युरिया पिकांपर्यंत न पोहोचता अतिपाण्यामुळे जमिनीत मुरून बसतो किंवा हवेत उडून जातो. ज्यामुळे जमीन अॅसिडिक बनते तसेच जलस्रोत हे प्रदूषित होतात. जमिनीतील युरियाच्या वापराला आळा घालण्यासाठी संशोधकांनी द्रव रूपातील नॅनो युरिया विकसित केले आहे. नॅनो युरिया ड्रोनच्या माध्यमातूनही पिकांवर फवारणी करता येणार आहे. पिकांवर फवारण्यासाठी एक लीटर पाण्यात 2-4 मिलीलिटर नॅनो युरिया मिसळावे लागते.
Nano Urea Nano DAP सोडत यादी?
तर, आता हा नॅनो युरिया आणि डीएपी हे शेतकर्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि या महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. (Nano Urea Nano DAP)
आपल्या जिल्ह्याची नॅनो युरिया आणि डीएपी सोडत यादी पहाण्यसाठी खालील लिंक वरती भेट द्या