Crop Insurance : पीक विमा अग्रिम वाटप प्रगतिपथावर | आतापर्यंत 965 कोटी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये ….उर्वरित वाटप लवकरच…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता Crop Insurance जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे आणि पीक विमा अग्रिम शेतकर्‍यांना वितरित करण्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला संबंधित जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Crop Insurance Update

 

तर, राज्यामध्ये 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा Crop Insurance अग्रिम बाबतच्या अधिसूचना काढण्यात आल्या आहेत आणि त्यापैकि फक्त पुणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीचे आक्षेप असून इतर जिल्ह्यांमध्ये पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी कडून पीक विमा अग्रिम रक्कम ही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात झाली आहे. पीक विमा अग्रिम रक्कम ही विमा कंपनीकडून 08 नोव्हेंबर पासून शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात झाली आहे.

 

 

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील एकूण 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांची पीक विमा Crop Insurance योजनेत नोंदणी झाली आहे आणि ही नोंदणी केवळ एक रुपयात शासनाने उपलब्ध करून दिली. दिनांक 08 नोव्हंबर पासून पीक विमा अग्रिम रक्कम वितरण सुरू झालेले असून अद्याप पर्यन्त 47 लाख 63 हजार पीक विमा अर्जाना मंजूरी दिली आहे. पीक विमा वितरण साठी 1954 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकि 965 कोटी रक्कम ही शेतकर्‍यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटपाचे काम हे प्रगतिपथावर आहे.

 

 

तर, ज्या शेतकर्‍यांना अद्याप पर्यन्त पीक विमा Crop Insurance अग्रिम रक्कम मिळाली नाही त्यांना पुढील काही दिवसांत ही अग्रिम रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे.

 

 

खरीप हंगाम 2023 (Crop Insurance)

 

एकूण पीक विमा अर्ज : 1,70,67,000

आतापर्यंत मंजूर अर्ज : 47,63,000

अग्रिम रक्कम : 1954 कोटी रुपये

वाटप केलेली रक्कम : 965 कोटी रुपये

उर्वरित वाटप करावयाची रक्कम : 989 कोटी रुपये

 

तुम्हाला पीक विमा अग्रिम मिळाला नाही? : येथे पहा

 

अधिक वाचा :

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

error: Content is protected !!