Posted in

Pik Vima Claim : नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत? | Total Claim / Payable Claim / Balance Claim जाणून घ्या?

Pik vima claim
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (3 votes)

Pik Vima Claim :  प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता त्यांना आता त्यांना आता पीक विमा स्टेटस अपडेट झालले पाहायला मिळत आहे. जर तुम्ही पण खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमचा पिक विमा मंजूर आहे का आणि मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे, हे आपण पीक विमा पोर्टल वर तपासू शकता. Pik Vima Claim

 

मागील काही दिवसांखाली आपण पहीतले की केवळ 7500 मंडळ मध्येच क्लेम दाखवत होते परंतु आज रोजी बरेच मंडळांचे पीक विमा क्लेम पूर्ण झाले आहेत आणि हे पोर्टल वर दाखविण्यात आलेले आहे. तरी, आपण आपल्या मोबाइल वरुण पोर्टल वर लॉगिन करा आणि आपली विमा रक्कम जाणून घ्या.  Pik Vima Claim

 

परंतु, पीक विमा क्लेम पाहत असताना आता तीन प्रकारच्या रक्कम पोर्टल वर दाखवत आहे तर या तीन प्रकारच्या रकमा कोणत्या हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. 

 

Total Claim Amount : ही रक्कम म्हणजे तुमच्या मंडळातील उत्पादनातील घट (Yield Loss), तुमचे पिकाचे क्षेत्र यावरून क्लेमची रक्कम ठरते. ही सर्व रक्कम शेतकर्‍याला देय असते. 

 

Payable Claim Amount : ही रक्कम म्हणजे ती प्रत्यक्ष रक्कम जी विमा कंपनीने मंजूर केली असून, ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही जमा होण्याची प्रक्रिया क्लेम दाखवल्यापासून जवळपास 15 दिवसांत पूर्ण होते. 

 

Balance Claim Amount : ही रक्कम म्हणजे विमा कंपनीने तुम्हाला द्यायची उर्वरित किंवा शिल्लक रक्कम. पीक विम्याच्या प्रक्रियेत अनेकदा नुकसानभरपाईची रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने दिली जाते. म्हणजेच ही रक्कम तुम्हाला पुढील टप्प्यात जेंव्हा राज्य / केंद्र शासनाचा निधि विमा कंपनिकडे जमा होईल त्यावेळेस ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाते. 

 

एकंदरीत, जी Total Claim Amount तुम्हाला पोर्टल वर दाखवत आहे ती सर्व रक्कम तुम्हाला मिळणार परंतु, ती रक्कम एक रकमी न मिळता दोन टप्प्यात खात्यात जमा केली जाणार आहे.  Pik Vima Claim

 

तर, आपण पण आपले पीक विमा स्टेटस तपासून घ्या !

 

असे तपासा तुमचा पीक विमा Crop Insurance Claim

 

पद्धत क्र. 1 

 

>> सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल, म्हणजेच क्रोम, गुगल किंवा इतर या ब्राउझरवर जाऊन PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे सर्च करायचा आहे.

>> यानंतर तुम्हाला समोर पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट दिसून येईल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे पर्याय दिसून येतील.

>> यातील Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे.

>> फार्मर कॉर्नरवर गेल्यानंतर लॉगिन करणे आवश्यक आहे.  यातील लॉगिन फॉर फार्मर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. Crop Insurance Claim

Crop insurance claim 1

 

>> पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे.  त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे.  Crop Insurance Claim

 

>> यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसून येईल. शेतकऱ्याचे नाव, पॉलिसी नंबर यासह इतर माहिती दिसून येईल.

 

>> पॉलिसी नंबरच्या ठिकाणी पॉलिसीची माहिती दिसून येईल. जर समजा तुम्ही खरीप 2024/2025 ची पॉलिसी घेतली असेल तर ती पाहता येईल.

 

>> त्या पॉलिसीवर क्लिक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती पाहता येईल.  हे पाहत असताना शेवटी तुम्हाला View या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

Crop insurance claim 2

>> यानंतर आपल्यासमोर दुसरी विंडो ओपन होणार आहे. त्यामध्ये संबंधित पॉलिसीबाबत माहिती दिली जाते, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे की नाही ते दाखवले जाते.  पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले असेल तर पुढे नुकसानीची टक्केवारी, पीक विम्याची रक्कम किती मंजूर झाले आहे, ते दाखवले जाते.

 

>> अशा पद्धतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा मंजूर आहे की नाही, आहे तर किती भरपाई मिळणार आहे, याबाबतची माहिती काही मिनिटात मोबाईलद्वारे घेता येईल. Crop Insurance Claim

 

तुमचा विमा तपासण्या साठी येथे भेट द्या : विमा पोर्टल Farmer Corner

 

 

पद्धत क्र. 2 

 

>> 7065514447 या क्रमांक वरती whatsapp वरुण hi मेसेज पाठवा

>> त्यानंतर भाषा निवडा

>> त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल, आणि पर्याय निवडा असा ऑप्शन दिसेल

>> पुढे ” दावा स्थिति” , हंगाम निवडा त्यानंतर तुम्हाला तुमचे त्या हंगाम चे पीक विमा स्टेटस दाखविले जाईल. 

 

Whatsapp वरून स्टेटस चेक करण्यासाठी : येथे भेट द्या

 

error: Content is protected !!