Posted in

Cotton Market Rate : पांढऱ्या सोन्याची हमीभावावर मात | या जिल्ह्यात ८८०० रुपयांचा विक्रमी दर

Cotton market rate
5/5 - (1 vote)

Cotton Market Rate : यंदाचा कापूस हंगाम जवळपास संपत आला असताना खाजगी बाजारात कापसाच्या दरात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हंगामाच्या अखेरीस परभणी जिल्ह्यात बाजारपेठेत शुक्रवारी दि 17 एप्रिल रोजी कापसाला तब्बल ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला. या हंगामातील हा सर्वाधिक दर असून कापसाने जिल्ह्यात शासनाच्या हमीभावावरही मात केली आहे.

 

हंगामभर कापसाचे दर ७ हजार ते ७५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यानच स्थिर होते. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. यापूर्वी सेलू येथील खाजगी बाजारपेठेत कापसाला ८४७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, तर सध्या अनेक ठिकाणी ८५०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहे. (Cotton Market Rate)

 

दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत मानली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून कृत्रिम धाग्यांचे दरही वाढले आहेत. परिणामी कापड उद्योगाने पुन्हा कापसाकडे वळल्याने मागणीत वाढ झाली आहे. तसेच पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यानेही कापसाच्या दरात तेजी आली आहे. (Cotton Market Rate)

 

दरम्यान, ‘सीसीआय’ने कापूस खरेदी उशिरा सुरू केल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांना खाजगी बाजारावर अवलंबून राहावे लागले. अनेक शेतकऱ्यांना हमीभाव ₹८१०० देखील मिळाला नाही आणि शेवटी ७५०० ते ८००० रुपयांच्या दराने कापूस विकावा लागला. ‘सीसीआय’ची खरेदी १५ मार्चला बंद झाल्यानंतर मात्र बाजारात दरात वाढ झाली. (Cotton Market Rate)

 

सध्या जिल्ह्यातील परभणी, मानवत आणि सेलू या बाजारपेठांत कापसाची आवक होत असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे दर वाढूनही त्याचा लाभ मर्यादित प्रमाणातच मिळत आहे. जिल्ह्यात ‘सीसीआय’ आणि खाजगी बाजार मिळून एकूण १८ लाख २१ हजार ४४० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा उत्पादनातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

 

MahaDBT Seed Subsidy

 

हे पण पहा :

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

error: Content is protected !!