Ration Card eKYC : रेशन कार्ड ई-केवायसी केली का? | आता या तारखे पर्यन्त केवायसी करा …अन्यथा धान्य मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

 

Ration Card eKYC : शासनाने रेशनकार्डवरील ई -केवायसी करण्याची अंतीम तारीख ही 31 डिसेंबर देण्यात आली होती. दरम्यान आता ई-केवायसी करण्या साठी राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णया मुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Ration Card Ekyc Date
Ration Card Ekyc

 

तर, आता रेशन कार्ड ई -केवायसी (Ration Card eKYC) करण्याची अंतीम तारीख ही 15 फेब्रुवारी पर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो. प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आले होती. मात्र या मुदतीत संपूर्ण लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नसल्याने आता केंद्र सरकारने या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. (Ration Card eKYC)

 

 

सरकारने काही महिन्यांपूर्वी केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात आता सर्व रेशनकार्ड धारकांनी ई- केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख 15 फेब्रूवारी २०२५ आहे. आतापर्यंत दोन वेळेस ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 

 

दरम्यान राज्यात १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडील ई-पॉस मशिन वर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागा कडून करण्यात आले आहे.

 

 

कोठे करावी ई केवायसी ?  (Ration Card eKYC)

 

‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानात ई-केवायसी करुन घ्यावी. ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील.

 

 

अन्यथा धान्य मिळणार नाही

 

शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी बंधनकारक आहे. शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही.

 

 

हे पण पहा :

 

* ७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल

* 1 एप्रिल पासून टप्पा 2 चे काम होणार सुरू | पोकरा प्रकल्प टप्पा 2

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!