Soybean Procurement : राज्यात सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी साठी 209 केंद्र | NAFED
Soybean Procurement : केंद्र सरकार हे २०२४-२५ च्या हंगामात सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकांची हमीभावाने खरेदी करणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही खरेदी राज्यात केली जाणार आहे.
राज्यात सोयाबीन, मुग उडीद खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफने एकूण २०९ हमीभाव खरेदी केंद्रांना मंजूर दिली आहे. राज्यातील एकूण १९ जिल्ह्यात नाफेडची १९ खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तर एनसीसीएफची ७ जिल्ह्यांमध्ये ६३ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रांवर दिनांक १० ऑक्टोबरपासून मुग आणि उडीद तर १५ ऑक्टोबरपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात येणार आहे. (Soybean Procurement)
नाफेड ची जिल्हा निहाय खरेदी केंद्र (Soybean Procurement)
अकोला ९,
अमरावती ८,
बीड १६,
बुलढाणा १२,
धाराशिव १५,
धुळे ५,
जळगाव १४,
जालना ११,
कोल्हापूर १,
लातूर १४,
नागपूर ८,
नंदुरबार २,
परभणी ८,
पुणे १,
सांगली २,
सातारा १,
वर्धा ८,
वाशिम ५ आणि
यवतमाळ जिल्ह्यात ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
एनसीसीएफ ची जिल्हा निहाय खरेदी केंद्र
एनसीसीएफचे नाशिक जिल्ह्यात ६
अहमदनगर ७,
सोलापूर ११,
छत्रपती संभाजीनगर ११,
हिंगोली ९,
चंद्रपुर ५ आणि
नांदेड १४ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
शेतकर्यांसाठी सूचना
शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग उडीद हमीभाव खरेदीचा लाभ घेण्याचं आव्हान मार्केट फेडरेशन केलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे. (Soybean Procurement)
* दि. 5 ऑक्टोबर ला “या” शेतकर्यांना मिळणार रु. 4000
* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
Tags : nafed, nccf, nafed_procurement, soybean_procurement, soybean_msp, soyabin_procurement, nafed_nccf_esamruddhi_porta_procurement, soyabin_udid_moong_procurement,