Tomato Market: टोमॅटो मार्केट मध्ये आली तेजी | संपूर्ण देशात टोमॅटो बाजार तेजीत
Tomato Market: काही महिन्यापूर्वी टोमॅटो ला बाजारात खूप कमी दर मिळत होता तर काही ठिकाणी कवडीमोल भावात टोमॅटो ला दर मिळाला होता. टोमॅटो हे बाजारात नेण्यासाठी जो खर्च लागत होता तो देखील शेतकर्यांना मिळत नव्हता त्यामुळे टोमॅटो हे फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती.
परंतु सध्या टोमॅटोचा बाजार (Tomato Market) हा तेजीत आला आहे. महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये बाजारात टोमॅटो हा प्रती किलोग्राम 100 रुपये दर मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात च नव्हे तर संपूर्ण देशात टोमॅटो चे दर तेजीत आहेत.
संपूर्ण देशात टोमॅटो (Tomato Market) चा कमीत कमी दर हा 56 रुपये आहे तर जास्तीत जास्त दर हा 123 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 100 रुपये प्रती किलो पाहायला मिळत आहेत.
सध्या बाजारात टोमॅटो ची आवक कमी झाल्यामुळे हे दर जास्त पाहायला मिळत आहेत असे जाणकरांनी संगितले आहे. तसेच, नवीन टोमॅटो पीक येण्यास अजून एक ते दीड महिन्याचं कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हेच दर पुढील काही दिवस पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व बाजारसमिती मधील टोमॅटो आवक, आणि बाजारभाव पाहण्यासाठि खालील लिंक वरती जावे :
दिनांक 04 जुलै 2023 : टोमॅटो बाजारभाव पहा
अधिक वाचा :
* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध
* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार
* मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे‘ मोठे निर्णय
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा