TRAI New Rules : आता रीचार्ज न करता 3 महीने अक्टिव्ह राहणार तुमचे सिम कार्ड… नवीन नियम लागू
TRAI New Rules : सध्या प्रत्येक व्यक्ति ही दोन दोन सिम कार्ड वापरतो. परंतु रीचार्ज किमतीत वाढ झाल्यामुळे, अनेक वापरकर्त्यांनी बीएसएनएलमध्ये एक सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली. काही लोकांचे सिम कार्ड तर ब्लॉक झाले. वाढत्या किमतींमुळे परेशान असलेल्या ग्राहकांसाठी आता ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI New rules) ने आनंदाची बातमी दिली आहे. ट्रायच्या नियमांनुसार, आता ग्राहक कमी किमतीत जास्त काळासाठी आपले सिम कार्ड हे अक्टिव्ह करू शकतील.

अगोदर सिम कार्ड अक्टिव्ह करण्यासाठी बरेच मोठे रीचार्ज करावे लागत होते परंतु आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ट्रायच्या नवीन नियमामुळे आता आपण कमी किमतीमध्ये 4 महिन्या पर्यन्त आपला सिम कार्ड अॅक्टिव ठेऊ शकणार आहात. (TRAI New Rules)
आता ट्राय मोबाईल युजर कंझ्युमर हँडबुकनुसार, रिचार्ज संपल्यानंतर तुमचे सिम 90 दिवसांपर्यंत अक्टिव्ह राहील म्हणजे सिम कार्ड हे 3 महिन्यांसाठी अक्टिव्ह राहणार आहे.
20 रुपयांमध्ये 4 महिन्यांची वैधता? (TRAI New Rules)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमांनुसार, रीचार्ज संपल्यानंतर तुम्ही कोणताही प्लॅन अक्टिव्ह केला नाही तरीही तुमचे सिम कार्ड हे पुढील 90 दिवस अॅक्टिव राहील. जर तुम्ही 90 दिवसांनंतरही रिचार्ज केले नाही, तर तुमच्या सिममध्ये 20 रुपयांचा प्रीपेड बॅलन्स असेल तर कंपनी तो कपात करेल आणि सिमची वैधता 30 दिवसांसाठी वाढवली जाईल. म्हणजेच कोणत्याही प्लॅनशिवाय तुमच्या सिमची वैधता 120 दिवसांची म्हणजेच एकूण 4 महिने असेल. (TRAI New Rules)
ट्रायच्या मते, या 120 दिवसांनंतर, सिम कार्ड वापरकर्त्यांना त्यांचा नंबर पुन्हा सक्रिय करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल. तथापि, जर वापरकर्त्याने या 15 दिवसांत त्याचा नंबर अॅक्टिव केला नाही तर त्याचा नंबर पूर्णपणे ब्लॉक केला जाईल आणि तुमचा नंबर ब्लॉक झाला की तो नंबर दुसऱ्याला दिला जाईल.
तर या प्रमाणे नवीन नियम हे 23 जानेवारी पासून लागू होणार आहे.
अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
Tags : trai new rules 2025, jio recharge, airtel recharge, bsnl recharge plan, jio recharge plan 2025, jio, idea vodafone, airtel recharge plans 2025,