Agricultural Insurance : या जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार 04 नोव्हेंबर पर्यन्त विमा रक्कम | पीक विमा अग्रिम 2023
राज्यामध्ये पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला होता Agricultural Insurance आणि त्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला देण्यात आले होते. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये कंपनीने या वरती आक्षेप नोंदविले होते त्यामुळे अग्रिम भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होत होती परंतु आता राज्यातील सांगली, कोल्हापूर, परभणी आणि नागपुर या जिल्ह्यांमध्ये कंपनी ने कोणतेही आक्षेप घेतले नसून या जिल्ह्यांतील शेतकर्यांना दिनांक 04 नोव्हेंबर पूर्वी अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता आहे. Agricultural Insurance
पंतप्रधान खरीप पीक विमा योजना अंतर्गत राज्यातील सांगली, कोल्हापूर, परभणी आणि नागपुर या जिल्ह्यांमध्ये कंपनी ने अग्रिम रक्कम वरती कोणतेही आक्षेप घेतले नसून या जिल्ह्यांतील शेतकर्यांना दिनांक 04 नोव्हेंबर पूर्वी अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता आहे. तसेच, धाराशीव, अकोला, जालना, अमरावती या ठिकाणची सुनावणी ही पूर्ण झाली असून लवकरच अग्रिम रक्कम ही शेतकर्यांना देण्यात येणार आहे.
तसेच, धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड येथील विभागीय सुनावणी पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील चार दिवसांत विमा वितरण Agricultural Insurance सुरू करण्यात येणार असल्याची माहीती मिळत आहे.
बीड, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये अद्याप कंपनीने अग्रिम बाबतचे दावे हे मान्य केले नाहीत तर कंपनी ही केंद्राकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुढील सुनावणी नंतर च विमा मिळणे बाबतचे चित्र स्पष्ट होईल. Agricultural Insurance
अधिक वाचा :
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023
* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??