Unseasonal Rain Compensation : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि.३०.०१.२०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधितांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. Unseasonal Rain Compensation
खरीप २०२५ व या पुढील कालावधीकरीता केंद्र / राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक २७.०३.२०२३ प्रमाणे देय राहील, असा निर्णय दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त, नागपूर, पुणे, अमरावती आणि संभाजीनगर यांनी संदर्भ क्र. ४ ते ११ येथील पत्रान्वये माहे ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीत “अवकाळी पाऊस” यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुषंगाने दिनांक १६ एप्रिल २०२६ शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. Unseasonal Rain Compensation
माहे ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत “अवकाळी पाऊस” यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये ५३,७३,०७,०००/- (रूपये त्रेपन्न कोटी त्र्याहत्तर लक्ष सात हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविनियोजनाव्दारे तरतुद उपलब्ध करुन घेऊन कार्यासन मदत-३ (म-११) यांनी हा निधी वितरित करावा.



* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
