Bhausaheb Fundkar Falbag Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | आजची सोडत यादी पहा New MahaDBT Lottery List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Bhausaheb Fundkar Falbag Yojana : राज्यामध्ये मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये शेतकरी हे आंबा, लिंबू, चिकू, नारळ, चिंच, आवळा, पेरु, संत्रा, मोसंबी, जांभूळ, इत्यादि फळपिकांचा लाभ घेऊ शकतात.

 

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024

 

लाभार्थी पात्रता

 

खालील अटींची पूर्तता करणारे होतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील :

 

1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शोतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी. या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

2. शेतकऱ्याच्या स्वत: च्या नावे ७/१२ असणे आवश्‍यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्‍त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. सोबत विहित प्रपत्रातील नमुना जोडला आहे.

3. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.

4. यापुर्वी महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्‍ती यांची निवड करण्यात येईल.

 

 

लाभ क्षेत्र मर्यादा

 

1. या योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्‍टर ते कमाल १०.०० हेक्‍टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्‍टर ते कमाल ६.०० हेक्‍टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.

2. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.

3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा दोन हेक्‍टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ घेता येईल.

4. लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.

 

 

अर्जदारांची नोंदणी

 

1. सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आघार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकर्‍यांना एकदाच करावी लागणार आहे. (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)

 

2. संकेतस्थळ – महाडीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login  या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत.

 

अर्जदारास विशेष सुचना 

 

अर्जदाराने अर्ज करतांना ७/१२, ८ अ नुसार क्षेत्र, सर्व्हे नंबर, गावाचे नाव इत्यादी सर्व माहिती अचुक भरावी. अर्ज भरतांना चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होणार असल्याने तसेच अर्जामध्ये दर्शविलेल्या क्षेत्राप्रमाणे तसेच कलम/ रोप व लागवडीचे अंतर यांचे अनुदान मंजुर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे शेतक-यांनी सदर माहिती काळजीपुर्वक भरावी. (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)

 

फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी आनलाईन अर्ज करतेवेळी फळपिकाचे नाव, प्रकार-कलम/रोप, लागवड अंतराचे परीमाण अंदाजपत्रकात “मीटर” मध्ये देण्यात आले असुन, उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अंतरापैकी पसंतीनुसार अंतर निवडावे.

 

अर्जदाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीनुसार पुर्वसंमती रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहणार असल्याने अर्जामध्ये अचुक माहिती भरावी. Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

 

महाडीबीटी संगणकीय सोडत 

 

शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या विविध बाबींची महाडीबीटी पोर्टलवरील तालुका पातळीवर संगणकीय सोडत काढण्यात येईल तथापि ज्या प्रवर्गासाठी तालुका स्तरावर पुरेसा आर्थिक लक्षांक उपलब्ध होणार नाही अशावेळी फेरवितरण या सुविधेचा वापर करुन जिल्हा अधिक्षक कृषि अधकिरी स्तरावरुन तालुक्यांना लक्षांक फेरवाटप केला जाईल.

 

संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे त्यांच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल. त्यामुळे शेतक-याने सेवा केंद्र धारकाचा अथवा अन्य व्यक्तीचा मोबाईल नंबर न देता स्वत:चा मोबाईल क्रमांक नमूद करावा. Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

कागदपत्रे अपलोड करणे

 

संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर सादर करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

 

शेतकऱ्यांना सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लघु संदेशामध्ये नमुदप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणेकरीता ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांना मोबाईलद्वारे लघुसंदेश पाठवुन आणखी ०३ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)

 

 

आजची सोडत यादी 

 

24 जुलै 2024 सोडत यादी : येथे पहा

 

 

error: Content is protected !!