AH MahaBMS : पशुसंवर्धन विभाग गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन या साठी ही कागदपत्रे कागदपत्रे अपलोड करा | तुम्हाला निवड झाल्याचा SMS आला का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

पशुसंवर्धन विभागा मार्फत गतवर्षी म्हणजेच 2021-22  आणि 2022-23 या वर्षी AH MahaBMS पोर्टल वर गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन या साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकि पशुसंवर्धन विभागा ने काही लाभार्थ्यांची गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन यासाठी निवड करण्यात आलेली आहे. Gai Mhashi Vatap Yojana 2023

 

Ah Mahabms

 

AH MahaBMS पशुसंवर्धन विभाग

 

पशुसंवर्धन विभागा AH MahaBMS च्या या योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रका नुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी “AD-TECSSP” या नावाने SMS प्राप्त होतील. SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

 

 

तसेच, सन २०२३-२४ या वर्षी करिता अर्ज करण्याऱ्या नविन लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल. AH MahaBMS तर, नवीन इच्छुक लाभार्थी देखील आता या कालावधी मध्ये सन 2023-24 करिता पोर्टल वर अर्ज करू शकतील.

 

 

तर, ज्या लाभार्थ्यांना मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश मिळाला आहे त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या https://ah.mahabms.com/  या संकेतस्थळावरती जाऊन आपला आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक चे शेवटचे 6 अंक हे पासवर्ड या ठिकाणी टाकून पोर्टल वर लॉगिन व्हावे व निवड झालेल्या बाबी साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत. Gai Mhashi Vatap Yojana 2023

 

लॉगिन संदर्भात महत्वाची सूचना :

लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील आणि पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहतील.

 

कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत :

पोर्टल AH MahaBMS वर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि. ०८/१२/२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

 

अपलोड करावयाची कागदपत्रे : Gai Mhashi Vatap Yojana 2023

 

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य आहे)

२) सातबारा (अनिवार्य आहे)

३) ८ अ उतारा (अनिवार्य आहे)

४) अपत्य दाखला (अनिवार्य आहे) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य आहे )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

 

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी येथे भेट द्या : लॉगिन करा

 

अधिक वाचा :

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

error: Content is protected !!